शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

corona virus : जिल्ह्यात कोरोनाचा मोठा दिलासा : नवीन ३१६ रुग्णांसह १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 13:14 IST

corona virus, new patients, kolhapur news कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती सुधारत असून, शुक्रवारी नवीन रुग्णांच्या बाबतीत पुन्हा एकदा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देनवीन ३१६ रुग्णांसह १२ जणांचा मृत्यू८७२९ पैकी २२८१ रुग्णांवर रुग्णालयातून उपचार

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती सुधारत असून, शुक्रवारी नवीन रुग्णांच्या बाबतीत पुन्हा एकदा दिलासा मिळाला. सगळ्यांत महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णसंख्या घटत असल्याने आणि कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांतील खाटा रिकाम्या होत आहेत. शुक्रवारी उपचार घेणाऱ्या ८७२९ रुग्णांपैकी केवळ २२८१ रुग्ण हे विविध रुग्णालयांत उपचार घेत होते, यावरून आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाल्याचे स्पष्ट होते.कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी नवीन ३१६ रुग्णांची नोंद झाली; तर त्याच वेळी ३३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्याही घटत आहे. शुक्रवारी १२ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील या समाधानकारक कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य विभागाचा आत्मविश्वास वाढला आहे.गेल्या २४ तासांत कोल्हापूर शहरात सर्वांत जास्त म्हणजे ९१ नवीन रुग्णांची नोंद झाली. शाहूवाडी २०, राधानगरी ११, करवीर २६, हातकणंगले व गडहिंग्लज प्रत्येकी २४, चंदगड १९, तर भुदरगड ११ नवीन रुग्णांची नोंद झाली. कागल, पन्हाळा, आजरा, गगनबावडा या चार तालुक्यांत तर एका हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच रुग्ण आढळून आले. या आकडेवारीवरून कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे दिसून येते.मृतांमध्ये नऊ पुरुष, तीन महिलाजिल्ह्यात बारा रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये नऊ पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे. मृत व्यक्ती या हातकणंगले तालुक्यातील किणी वाठार, यळगूड, भुदरगडमधील पिंपळगाव, राधानगरी, आजरा, शहापूर, इचलकरंजी, करवीरमधील केर्ले, पन्हाळ्यातील बोरपाडळे यांसह बेळगाव, कऱ्हाड व सांगली येथील आहेत.कोरोना चाचण्याही घटल्याकोरोना रुग्णसंख्या घटत असल्यामुळे आता कोरोना चाचण्याही कमी झाल्या आहेत. शुक्रवारी १४३० चाचण्यांचे अहवाल सीपीआर रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाले. १०२६ आरटीपीसीआर चाचण्यांपैकी ८४१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले; तर १७९ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. ३११ ॲन्टिजेन चाचण्यांपैकी ४४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले; तर ४४ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले. खासगी रुग्णालयांत झालेल्या चाचण्यांमधून ९३ व्यक्तींना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.तालुकानिहाय रुग्णसंख्या अशी 

  • आजरा - ७९७, भुदरगड - १११५, चंदगड - १०४५, गडहिंग्लज - १२८१, गगनबावडा - १३०, हातकणंगले - ४९३१, कागल - १५४९, करवीर - ५२१०, पन्हाळा - १७४६, राधानगरी - ११७६, शाहूवाडी - १२०८, शिरोळ - २३३४, नगरपालिका हद्द - ६९३०, कोल्हापूर शहर - १३,६५२, इतर जिल्हा - १९५५.
  • एकूण रुग्ण - ४५ हजार ०५९
  • बरे झालेले रुग्ण - ३४ हजार ८६४
  •  मृत रुग्णांची संख्या - १४६६
  •  उपचार घेत असलेले रुग्ण - ८७२९
  • त्यांपैकी रुग्णालयात दाखल - २२८१
  • घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या - ६४४८
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर