शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

corona virus -प्रशासनाचे आवाहन बासनात,भाजी-धान्य खरेदीसाठी तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 18:08 IST

जमावबंदीचा आदेश, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, अन्नधान्याचा साठा करण्याची गरज नाही, पॅनिक होऊ नका.. या सगळ्या आवाहनाला बासनात बांधून ठेवत सोमवारी कोल्हापूरकरांनी भाजी मंडई आणि अन्नधान्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी केली. त्यामुळे व्यावसायिकांनी ग्राहकांना दुकानांबाहेरच रांगेत थांबवून साहित्य देण्याचा पर्याय काढला.

ठळक मुद्देप्रशासनाचे आवाहन बासनातभाजी-धान्य खरेदीसाठी तोबा गर्दी

कोल्हापूर : जमावबंदीचा आदेश, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, अन्नधान्याचा साठा करण्याची गरज नाही, पॅनिक होऊ नका.. या सगळ्या आवाहनाला बासनात बांधून ठेवत सोमवारी कोल्हापूरकरांनी भाजी मंडई आणि अन्नधान्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी केली. त्यामुळे व्यावसायिकांनी ग्राहकांना दुकानांबाहेरच रांगेत थांबवून साहित्य देण्याचा पर्याय काढला.महाराष्ट्रात कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रविवारी राज्यात १४४ कलम लागू करण्यात आला आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्ती एखाद्या ठिकाणी थांबू नये, अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, पुढील काही दिवसांत सर्वच दुकाने बंद होतील, या भीतीमुळे नागरिकांनी अन्नधान्याचा साठा करायला सुरुवात केली आहे. रविवारी सर्वत्र बंद होता सोमवारी सकाळपासूनच लक्ष्मीपुरी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होती.सोमवारी दुपारी बाराच्यादरम्यान बाजारपेठेत पाय ठेवायला जागा नव्हती. अनेक दुकानदार दुकानांचे शटर अर्धे खुले ठेवून ग्राहकांना साहित्यांची विक्री करत होते. काही दुकानदारांनी दुकानांमध्ये यायला ग्राहकांना बंदी केली होती. त्याऐवजी दुकानाबाहेर ग्राहकांच्या नावे बिल करून त्यांना बाहेर थांबायला लावले होते. नाव पुकारतील त्याप्रमाणे ग्राहकांच्या हाती साहित्य सोपवले जात होते. त्यामुळे बाजारपेठेतील सर्व रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ दिसत होती शिवाय वाहनांमुळेहीवाहतुकीची कोंडी झाली होती.याच दरम्यान महापालिकेची गाडी परिसरातून फिरत होती. ‘वाहने रस्त्याकडेला घ्या, दुकानांसमोर गर्दी करू नका, आरोग्याची काळजी घ्या’ असे आवाहन केले जात होते. व्यावसायिकहीदेखील गर्दी करू नका, आपल्या काळजीसाठीच हे सगळं सुरू आहे, असे सांगत होते. मात्र, बाजारपेठेतून ग्राहकांची गर्दी काही हटत नव्हती. अशीच गर्दी भाजी मंडईमध्ये देखील होती. भाजी विक्रेते. दुकानदार आणि ग्राहकदेखील तोंडाला मास्क बांधून दैनंदिन व्यवहार करत होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर