शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : मृताच्या साहित्य विक्रीवरही कोरोनामुळे संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:31 IST

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना थेट प्लास्टिकच्या कागदामधून गुंडाळून दहनासाठी नेले जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मृताच्या साहित्य विक्रीवरही परिणाम झाला आहे. नियमित महिन्याकाठी कोल्हापूर शहरात शंभर ते सव्वाशेजणांचा अपघात, आजारपणामुळे मृत्यू होतो. मात्र, हा आकडा कोरोनामुळे दुप्पट झाला आहे.

ठळक मुद्देमृताच्या साहित्य विक्रीवरही कोरोनामुळे संक्रांतअपघात, आजारपणामुळे मृत्यू होतो. मात्र, कोरोनामुळे आकडा दुप्पट

सचिन भोसलेकोल्हापूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना थेट प्लास्टिकच्या कागदामधून गुंडाळून दहनासाठी नेले जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मृताच्या साहित्य विक्रीवरही परिणाम झाला आहे. नियमित महिन्याकाठी कोल्हापूर शहरात शंभर ते सव्वाशेजणांचा अपघात, आजारपणामुळे मृत्यू होतो. मात्र, हा आकडा कोरोनामुळे दुप्पट झाला आहे.हिंदू धर्मातील चालीरितीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याची अंत्ययात्रा काढली जाते. ती तिरडीवरून काढली जाते. मृताचे साहित्य विक्री करणारे मोजकेच लोक शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठेत आहेत. मात्र, या साहित्य विक्रीवरही कोरोनामुळे संक्रांत आली आहे.

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीमुळे संसर्ग वाढू नये. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता प्लास्टिकच्या कागदामध्ये गुंडाळून दिला जातो. मृताला घरी न नेता थेट स्मशानभूमीत नेऊन दहन करण्याची सक्त सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मृताच्या साहित्य विक्रीवर व अन्य सर्वच विधीवरही परिणाम झाला आहे.

गेल्या दोन महिन्यांत ४०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. इतर आजारांनीही तितक्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी कोरोनाविना मृत झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी हे साहित्य नेले. मात्र, जे कोरोनामुळे मृत झाले त्यांच्यावर कोणताच विधी न करता थेट स्मशानभूमीत लाकडी सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी गुलाल नाही, तिरडी नाही की मंत्र नाही.काय लागते साहित्य..बांबूच्या काठ्या, गाडगी, सुतळी, गुलाल, खोबरेवाटी, चंदन,पाच मीटर पांढरे कापड,पान, सुपारी, हार असे साहित्य लागते. मृत पुरुष असेल तर त्याला पांढरी टोपी, धोतर, पंचा ,तर सुहासिनी महिला असेल तर तिच्याकरीता हिरवा चुडा, हिरवी साडी, कंगवा फणी, मणी मंगळसूत्र, हळदी-कुंकू (प्रत्येकी अर्धा किलो) लागते. विधवा असेल तर पांढरी साडी लागते. सरासरी हा खर्च दीड हजार रुपयांपर्यंत होत असतो. 

आमचा व्यवसाय शंभर वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. मृताच्या साहित्याला कधी मंदी येत नाही, असे लोक म्हणायचे; परंतु कोरोनामुळे ते देखील खोटे ठरविले आहे. गेल्या चार महिन्यांत या साहित्य विक्रीवरही कोरोनाने परिणाम केला आहे.- राजेंद्र निकम, मृताचे साहित्य विक्रेते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर