शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

corona virus : जिल्ह्यात नवीन ६५ कोरोना रुग्णांची नोंद , चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 19:46 IST

Coronavirus, cprhospital, kolhpaurnews कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन ६५ रुग्णांची शुक्रवारी नोंद झाली, तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, रुग्ण संख्या घटत असल्यामुळे स्थापन केलेली कोविड सेंटर्स पैकी पन्नास टक्के कोविड सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. मात्र तेथील सेटअप तसाच ठेवण्यात आला आहे. नवीन रुग्ण नसल्यामुळे हा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला.

ठळक मुद्देजिल्ह्यात नवीन ६५ कोरोना रुग्णांची नोंद , चौघांचा मृत्यूसंसर्ग कमी झाल्याने यंत्रणेवरील ताण कमी

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन ६५ रुग्णांची शुक्रवारी नोंद झाली, तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, रुग्ण संख्या घटत असल्यामुळे स्थापन केलेली कोविड सेंटर्स पैकी पन्नास टक्के कोविड सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. मात्र तेथील सेटअप तसाच ठेवण्यात आला आहे. नवीन रुग्ण नसल्यामुळे हा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला.कोल्हापूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. सध्या जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता १९५९ पर्यंत खाली आली आहे. त्यापैकी १२६२ रुग्ण आपल्या घरीच राहून उपचार घेत आहेत, तर केवळ ६९७ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण एकदमच कमी झाला आहे.शुक्रवारी जिल्ह्यात ६५ नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ७०८ वर गेली, तर ७५ रुग्ण कोरोनातून बरे झाल्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ हजार १२८ वर पोहचली आहे.पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडीतील ६० वर्षीय पुरुष, कोडोलीतील ५३ वर्षीय पुरुष, आजऱ्यातील भादवण गावची ६५ वर्षीय महिला तर सांगलीतील कलानगर येथील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. जिल्ह्यात मृत्यू होणाऱ्यांची संख्या १६२१ इतकी झाली आहे.कोल्हापुरात २२ नवीन रुग्ण सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या कोल्हापूर शहरात शुक्रवारी २२ नवीन रुग्ण आढळून आले. राधानगरी, शाहूवावाडी येथे प्रत्येकी एक, आजरा,भुदरगड, पन्हाळा तालुक्यात प्रत्येकी दोन, चंदगड तालुक्यात तीन करवीरमध्ये चार, शिरोळमध्ये पाच, हातकणंगले तालुक्यात नऊ रुग्णांची नोंद झाली. गगनबावडा व कागल येथे एकही रुग्ण आढळून आलेला नाही.पन्नास टक्के कोविड सेंटर्स बंद

 कोरोनाचा संसर्ग जसा वाढत जाईल तसे विविध ठिकाणी जिल्हा व आरोग्य प्रशासनातर्फे ९६ कोविड सेंटर्स स्थापन केली होती. त्याचा चांगला उपयोग रुग्णांसाठी झाला. परंतू आता संसर्ग कमी होत असल्याने तसेच रुग्ण संख्या घटत असल्यामुळे त्यातील पन्नास टक्के सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय