शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोनामुक्तीसाठी शहरात १५ हजार लिटर औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 15:48 IST

कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढाईत कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाने मोठे योगदान दिले. ६७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहराच्या परिसरात किमान चार वेळा औषध फवारणी करण्यात आली. त्यामध्ये १४ हजार ५०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड, तर ४०० लिटर सायप्रोतीन या औषधी द्रव्याचा फवाणीकरिता वापर करण्यात आला. शहर निर्जंतुकीकरणाची ही मोहीम अव्याहतपणे गेले पाच महिने सुरू आहे.

ठळक मुद्देकोरोनामुक्तीसाठी शहरात १५ हजार लिटर औषध फवारणीचार वेळा संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण : महापालिका आरोग्य विभागाचे महत्त्वाचे काम

कोल्हापूर : कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढाईत कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाने मोठे योगदान दिले. ६७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहराच्या परिसरात किमान चार वेळा औषध फवारणी करण्यात आली.त्यामध्ये १४ हजार ५०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड, तर ४०० लिटर सायप्रोतीन या औषधी द्रव्याचा फवाणीकरिता वापर करण्यात आला. शहर निर्जंतुकीकरणाची ही मोहीम अव्याहतपणे गेले पाच महिने सुरू आहे.कोल्हापूर शहरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाने मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून नियोजन करून त्यानुसार शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शहरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आणि महापालिका प्रशासन सक्रिय झाले. ज्या ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळतील, त्या त्या भागांतील तीन किलोमीटरच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येऊ लागले.सुरुवातीच्या काळात रुग्ण फारच कमी होते. भक्तिपूजानगर, कसबा बावडा परिसरांत रुग्ण आढळून आले. मात्र आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरणाची मोहीम राबिवण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. त्यामुळे जेथे रुग्ण आढळले नाहीत तेथेही औषध फवारणी सुरू राहिली.महापालिकेकडे सुरुवातीला औषध फवारणीकरिता सहा ट्रॅक्टर होते. नंतर आणखी चार ट्रॅक्टर तातडीने खरेदी केले. संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय झाल्यामुळे १० ट्रॅक्टरांच्या जोडीला अग्निशमन दलाचे चार बंब घेण्यात आले. सोबतीला ७५ स्प्रेयिंग पंपही होते.

एक-एक प्रभाग करीत शहरातील सर्व ८१ प्रभागांचे पहिल्या २० दिवसांतच निर्जंतुकीकरण करण्यात आले. पुढे ही यंत्रणा तशीच कार्यान्वित ठेवण्यात आली. सातत्याने औषध फवारणी सुरू राहिली. रात्रीच्या वेळीही हे काम सुरूच ठेवले. गेल्या पाच महिन्यांत औषध फवारणीच्या किमान चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे यात मोठे योगदान आहे.कर्मचाऱ्यांना बूट, मास्क, हँडग्लोव्हजआरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काम तसे जोखमीचे होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा भाग म्हणून प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना गमबूट, मास्क, रुमाल, हॅन्डग्लोव्हज, सॅनिटायझर, साबण, रेनकोट, आदी वस्तू तत्काळ उपलब्ध करून दिल्या.सोडियम हायपोक्लोराईड प्राप्त -

  • गुजरातस्थित अल्कली कंपनीकडून - १४ हजार लिटर
  • महानगरपालिकेकडून खरेदी - ६००० लिटर
  •  जिल्हा परिषदेकडून मोफत - १००० लिटर
  • एकूण सोडियम हायपोक्लोराईट - २१ हजार लिटर
  • त्यांपैकी वापरले - १४ हजार ५०० लिटर
  • शिल्लक सोडियम हायपोक्लोराईड - ५५५० लिटर

औषध फवारणीकरिता वापरलेली यंत्रणा -

  • लहान-मोठे ट्रॅक्टर - १०
  • स्प्रेयिंग पंप चार्जेबल - ७५
  • अग्निशनम दलाचे बंब - ४ 

धूर फवारणीकरिता ४०० लिटर सायप्रोतीनशहरात एकीकडे कोरोना संसर्ग तर दुसरीकडे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण शहर निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईड औषध फवारले जात होत तर डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायप्रोतीन औषधाचा धूर फवारणी केली जात होती. शहरात धूर फवारणीकरिता आतापर्यंत जवळपास ४०० लिटर सायप्रोतीन वापरले गेले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर