शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

कोल्हापूरला मोठा दिलासा: कोरोना रुग्ण व मृत्यू घटले, डिस्चार्जही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 20:01 IST

CoronaVirus In Kolhapur : संपूर्ण जिल्हा सोमवारपासून अनलॉक होत असल्याचा निर्णय होत असतानाच कोरोनानेही काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे शनिवारी आलेल्या अहवालानंतर स्पष्ट झाले. शनिवारी रुग्ण संख्या व मृत्यूही घटले. नवे ९३८ रुग्ण आढळले तर ९५६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. मृत्यूही १८पर्यंत खाली आले. तब्बल महिनाभरानंतर रुग्ण संख्या हजाराच्या खाली आल्याने कोल्हापूरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोरोना रुग्ण व मृत्यू घटले, डिस्चार्जही वाढलेमहिनाभरानंतर रुग्णसंख्या हजाराच्या खाली

कोल्हापूर: संपूर्ण जिल्हा सोमवारपासून अनलॉक होत असल्याचा निर्णय होत असतानाच कोरोनानेही काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे शनिवारी आलेल्या अहवालानंतर स्पष्ट झाले. शनिवारी रुग्ण संख्या व मृत्यूही घटले. नवे ९३८ रुग्ण आढळले तर ९५६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. मृत्यूही १८पर्यंत खाली आले. तब्बल महिनाभरानंतर रुग्ण संख्या हजाराच्या खाली आल्याने कोल्हापूरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.गेले तीन दिवस स्थिर असणारा आकडा शनिवारी एकदम ९३८ पर्यंत कमी आला. २१ जूनला ९४० इतकी या दोन महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली होती. त्यानंतर आकडे वाढतच गेल्याने चिंता वाढली होती, पण मागील आठवड्यापासून कोरोनाचा विळखा सैल होऊ लागला आहे. मृत्यूही २५ च्यावरच होते, पण शनिवारी तोही आकडा १८ पर्यंत कमी झाला. त्यातही एक मृत्यू मध्यप्रदेशातील आहे. कोल्हापूर शहरात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी रुग्णसंख्या ५८ ने वाढली असलीतरी मृत्यू अवघे तीन आहेत. हातकणंगलेत सर्वाधिक सहा मृत्यू आहेत.गगनबावड्यात रुग्ण व मृत्यू संख्या शुन्यावर आली आहे. शनिवारी एकही बाधीत आढळला नाही आणि मृत्यूही झाला नाही. राधानगरी, भूदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, चंदगडमध्ये एकही मृत्यू झालेला नाही हे आणखी एक दिलासादायक बाब शनिवारी घडली.आजचे मृत्यू

  • कोल्हापूर शहर: ०३ कसबा बावडा, गुजरी कॉर्नर, सुभाषनगर
  • कागल: ०२ पिंपळगाव, रणदिवेवाडी,
  • करवीर: ०३ वळीवडे, परिते, हलसवडे
  • हातकणंगले: ०६ पारगाव, इचलकरंजी दोन, पट्टणकोडोली, साजणी, हुपरी,
  • शिरोळ: ०२ सैनिक टाकळी, जयसिंगपूर,
  • गडहिग्लज: ०१ कडगाव,
  • इतर जिल्हा: ०१ गुलेवडी (मध्यप्रदेश),
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर