शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात उद्यापासून १० वीची परीक्षा, "कोरोना"मुळे चार विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:58 IST

कर्नाटकात उद्या गुरुवारपासून इयत्ता दहावीच्या अर्थात एसएसएलसीच्या बोर्ड परीक्षेला प्रारंभ होत असून ८.५० लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गामुळे बेळगांव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

ठळक मुद्दे"कोरोना"मुळे चार विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव उद्यापासून सुरू होणार १० वीची परीक्षा

बेळगाव : कर्नाटकात उद्या गुरुवारपासून इयत्ता दहावीच्या अर्थात एसएसएलसीच्या बोर्ड परीक्षेला प्रारंभ होत असून ८.५० लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गामुळे बेळगांव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटकात उद्या गुरुवार दि. २५ जून २०२० पासून इयत्ता दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षेला प्रारंभ होत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात ही परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे राज्य शासनाच्या आदेशावरून सर्व त्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तथापि कोरोना संसर्गामुळे बेळगांव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांपैकी एक जण कोरोनाबाधित असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांसह त्याच्या संपर्कातील त्याच्या तीन मित्रांना मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये कॉरन्टाईन करण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेळगाव जिल्ह्यासह राज्यात कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना या झोनची सीमारेषा ओलांडण्यास बंदी आहे, हे लक्षात घेऊन शिक्षण खात्याने यावर उपाय शोधून काढला आहे. त्यानुसार राज्यात जितके कंटेनमेंट झोन आहेत येथील विद्यार्थ्यांची त्यांच्या-त्यांच्या झोनमध्येच दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर जाणार नाहीत आणि त्यामुळे इतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये असलेली कोरोना संसर्गाची भीती देखील नाहीशी होणार आहे.

बेळगाव जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमधील एकूण २० विद्यार्थी यंदाची दहावीची परीक्षा देणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याच्या सहकार्याने जिल्हा शिक्षण खात्याकडून या विद्यार्थ्यांची आता त्यांच्या-त्यांच्या झोनमध्ये परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे.दरम्यान, उद्या गुरुवारपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होत असल्याने शहरातील परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी केली जात आहे. महिला विद्यालय मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जावे यासाठी बुधवारी जमिनीवर मार्किंग करण्याबरोबरच अन्य आवश्यक कामे सुरू असल्याचे पहावयास मिळाले.

महीला विद्यालयाप्रमाणेच शहरातील अन्य परीक्षा केंद्राच्या ठिकाणीही सोशल डिस्टंसिंगचे मार्किंग, सॅनीटायझेशन व मास्कची व्यवस्था, सोशल डिस्टंसिंगनुसार विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक टाकणे आदी कामे सुरू होती. उद्यापासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत दरम्यान कडक पोलिस बंदोबस्तसह कोरोना संदर्भातील नियमांचे देखील काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :ssc examदहावीbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक