शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण: जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 15:56 IST

CoronaVirusUnlock, Collcator, kolhapurnews आरोग्यसेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांनी तालुका आरोग्याधिकारी, शहर आरोग्याधिकारी, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

ठळक मुद्देजिल्ह्यात जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण: जिल्हाधिकारी दौलत देसाईआरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणीचे आवाहन, जिल्हा कृतीदल समितीची बैठक

कोल्हापूर : राज्य शासनामार्फत जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्यसेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांनी तालुका आरोग्याधिकारी, शहर आरोग्याधिकारी, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.कोरोना लसीकरणाच्या अंमलबजावणीच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा कृती दल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, नोडल अधिकारी डॉ. फारूख देसाई उपस्थित होते.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, लसीकरणासाठी सर्व शासकीय डॉक्टर्स, आरोग्यसेवक यांची नोंदणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. परंतु, खासगी डॉक्टर्स आणि खासगी आरोग्य यंत्रणेशी निगडित काम करणारे जे सेवक आहेत, संस्था आहेत, यांची नोंदणी अद्यापही अपूर्ण आहे.

जे वैद्यकीय क्षेत्रात काम करीत आहेत आणि ज्यांनी वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केली आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांनी आपली नोंदणी तालुका आरोग्याधिकारी, शहर वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त कार्यालयात करावी. यामुळे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या मोहिमेत सुलभतेने लसीकरण करता येईल.डॉ. साळे म्हणाले, लसीकरणासाठीच्या पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक, कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि नगरपालिका, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा तर तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा व्यक्तींचा समावेश आहे.बैठकीला राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, नगरपालिका प्रशासन एम. एस. निगवेकर, एस. एस. घोरपडे, आदी उपस्थित होते.५ लाख ५७ हजार लाभार्थीनोडल अधिकारी देसाई यांनी लाभार्थ्यांची नोंदणी, लसीकरण पथकाचे प्रशिक्षण, लसीसाठी शीतसाखळी केंद्रे याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, पहिल्या टप्प्यासाठी पाच लाख ५७ हजार १७६ लाभार्थी आहेत; तर जिल्ह्यात एकूण १२२ शीतसाखळी केंद्रे आहेत. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर