शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

corona in kolhapur-हरळी खुर्दच्या सीमेवर माजी सैनिकांचा पहारा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:13 IST

देशाच्या सीमेवर अतिरेक्यांबरोबर दोन हात करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या आजी-माजी सैनिकांनी आता गावकऱ्यांच्या जीविताच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शीरावर घेतली आहे. गावच्या ‘पांढरीत’ कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून ते आपल्या वेशीवर २४ तास खडा पहारा देत आहेत. त्यामुळे ‘हरळी खुर्द’ येथील आजी-माजी सैनिकांचे गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात विशेष कौतुक होत आहे.

ठळक मुद्देहरळी खुर्दच्या सीमेवर माजी सैनिकांचा पहारा..!ना नफा..ना तोटा तत्वावर घरोघरी पोहचवताहेत भाजीपाला, किराणा माल

राम मगदूम

गडहिंग्लज- देशाच्या सीमेवर अतिरेक्यांबरोबर दोन हात करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या आजी-माजी सैनिकांनी आता गावकऱ्यांच्या जीविताच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शीरावर घेतली आहे. गावच्या ‘पांढरीत’ कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून ते आपल्या वेशीवर २४ तास खडा पहारा देत आहेत. त्यामुळे ‘हरळी खुर्द’ येथील आजी-माजी सैनिकांचे गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात विशेष कौतुक होत आहे.गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर २८२८ लोकसंख्या आणि अवघे ५५०-६०० उंबरे असणाऱ्या या गावात एकूण ९४ आजी-माजी सैनिक आहेत. गावासाठी कांही तरी करण्याची जिद्द उराशी बाळगून ते एकत्र आले आहेत. त्यासाठी त्यांनी आपली संघटना स्थापन केली आहे.१९७१ च्या भारत-पाक युद्धात इथले जवान शामराव रायाप्पा ऐवाळे हे शहीद झाले. मातंग समाजातील त्या जवानाच्या स्मरणार्थ त्यांनी वैयक्तिक वर्गणी काढून गावच्या वेशीवर ६ लाखाची स्वागत कमान उभारली आहे.‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी आठवड्यापूर्वी सरकारने लॉकडाऊनचा आदेश अचानक जारी केला. त्यावेळी त्यांनी संघटनेतर्फे आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला आणि मोठ्या गावातून किराणा माल खरेदी करून गावात आणला. त्यावर कोणताही नफा न मिळविता आणलेल्या किमतीत तो ग्रामस्थांना घरपोच केला.दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांनी गावबंदीचा हुकूम जारी केल्यानंतर त्यांनी उत्स्फूर्तपणे ग्रामपंचायतीच्या परवानगीने गावच्या सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी संघटनेकडे घेतली आहे. गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नोंदी ठेवणे, रस्त्यावर फिरणाऱ्या होम क्वॉरंटाईनना घरात बसविणे व प्रबोधनाचे कामदेखील ते मनापासून आणि आनंदाने करीत आहेत. त्यांनी सैनिकी गणवेशात आळीपाळीने गावच्या वेशीवर २४ तासांचा जागता पहारा ठेवला आहे.संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राजे, उपाध्यक्ष जयसिंग पाटील, खजिनदार संजय पाटील, सचिव शशीकांत चौगुले, सिद्राम कानडे, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, बबन चौगुले, सुरेश पाटील आदींच्या नेतृत्वाने हे काम सुरू आहे.

संकटकाळी गावासाठी उत्स्फूर्तपणे झटणाऱ्या सैनिकांमुळे ग्रामस्थांचे मनोधैर्य वाढण्यास मदत झाली आहे. त्यांच्या अनमोल कामगिरीबद्दल ग्रामस्थ सदैव कृतज्ञ राहतील.- बाळकृष्ण परीट, माजी सरपंच.

१ हजार मास्क वाटणारगावातील गरजूंना १ हजार मास्क संघटनेतर्फे मोफत वाटण्याचा निर्णय सैनिकांनी घेतला आहे. त्यासाठी कापडी मास्क शिवण्याचे काम त्यांनी गावातील महिलांना दिले आहे. त्यातून कांही महिलांना रोजगारही मिळाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर