शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -‘ते’ बंदोबस्तात रस्त्यावर, तर ‘त्या’ रुग्णसेवेत : कोरोनाविरोधात दोघांचाही लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 11:46 IST

जनसेवा हेच त्यांचे आद्य कर्तव्य, तोच ध्यास, देशसेवेची त्यांनी शपथ घेतली अन् स्वत:च्या जिवाची पर्वा न करता हे दाम्पत्य आज ‘कोरोना’पासून जनतेच्या रक्षणार्थ आपापल्या क्षेत्रात लढा देत आहे. एक पोलीस प्रशासनात, तर एक रुग्णसेवेत आपली पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. हे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व त्यांच्या पत्नी डॉ. सोनाली देशमुख होय. जिल्ह्याला अभिमान वाटावे असे त्यांचे कर्तृत्व जनतेसमोर आले आहे.

ठळक मुद्दे‘ते’ बंदोबस्तात रस्त्यावर, तर ‘त्या’ रुग्णसेवेत : कोरोनाविरोधात दोघांचाही लढाडॉ. सोनाली व डॉ. अभिनव देशमुख दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद

कोल्हापूर : जनसेवा हेच त्यांचे आद्य कर्तव्य, तोच ध्यास, देशसेवेची त्यांनी शपथ घेतली अन् स्वत:च्या जिवाची पर्वा न करता हे दाम्पत्य आज ‘कोरोना’पासून जनतेच्या रक्षणार्थ आपापल्या क्षेत्रात लढा देत आहे. एक पोलीस प्रशासनात, तर एक रुग्णसेवेत आपली पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. हे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व त्यांच्या पत्नी डॉ. सोनाली देशमुख होय. जिल्ह्याला अभिमान वाटावे असे त्यांचे कर्तृत्व जनतेसमोर आले आहे.हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाची कोल्हापूर जिल्ह्यातही काही प्रमाणात लागण झाली; पण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणा जलद गतीने हाताळून पोलिसांच्या साथीने कोरोनाला जिल्ह्याच्या सीमेवरच रोखले. दुसऱ्या बाजूने त्यांच्या पत्नी डॉ. सोनाली देशमुख ह्या ‘सीपीआर’च्या कोरोना कक्षात जिवाची बाजी लावत रुग्णसेवेत आहेत.

डॉ. अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर जिल्हा अधीक्षक पदाची सूत्रे घेतल्यानंतर पोलिसांना विश्वासात घेऊन काम केले. दोन नंबरवाल्यांची पाळेमुळे खणून काढली. गडचिरोलीमध्येही त्यांनी नक्षलवाद्यांची चळवळ मोडीत काढली; तर त्यांच्या पत्नी डॉ. सोनाली यांची आरोग्यसेवेतील कामगिरी विशेष कौतुकास्पद आहे.कोल्हापुरात डॉ. अभिनव देशमुख हे जिल्ह्याला ‘कोरोना’ची लागण होऊ नये म्हणून पोलिसांसह अहोरात्र रस्त्यावरच आहेत; तर दुसरीकडे डॉ. सोनाली देशमुख ह्या सहकारी डॉक्टरांसमवेत ‘सीपीआर’मध्ये कोरोनाविरोधात लढा देत रुग्णसेवा बजावत आहेत.

पोलीस आणि आरोग्य ही दोन्हीही क्षेत्रे वेगवेगळी; पण ध्येय एकच. त्यासाठी हे दाम्पत्य आपापल्या क्षेत्रात कोरोनाच्या मृत्युछायेत सेवा बजावत आहे. इतरांप्रमाणे देशमुख दाम्पत्यालाही इरा आणि कणाद अशी दोन चिमुकली आहेतच; पण स्वखुषीने सेवा बजावणाºया देशमुख दाम्पत्याची सेवा, कर्तव्य हे आदर्शवतच आहे.कोल्हापूरकरांनाही आवाहनडॉ. देशमुख दाम्पत्य हे जिवाची बाजी लावून सेवा बजावत असताना कोल्हापूरकरांनी कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत घरातच थांबावे, सोशल डिस्टन्सिंगचे सौजन्य पाळावे.डॉ. सोनाली मूळच्या सांगलीच्याडॉ. सोनाली देशमुख यांचे शिक्षण आणि बालपण मुंबईत गेले असले तरीही त्यांचे मूळ गाव सांगली आहे. त्या एम.बी.बी.एस., डी.एन.बी. आहेत. कोल्हापुरात ‘सीपीआर’मध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून त्या सेवा बजावतात. कोरोना कक्षात त्याही रुग्णसेवेत आहेत. डॉ. अभिनव देशमुख सकाळी दहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत कामात व्यस्त असतात. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर