शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

corona in kolhapur-पेट्रोल, डिझेल केवळ अत्यावश्यक सेवेकऱ्यांनाच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 18:48 IST

कोरोना विषाणूचे गांभीर्य न ओळखता विनाकारण चमकोगिरी करीत फिरणाºयांवर वचक बसावा, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाºया वाहनधारकांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे आदेश पंपचालकांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी गुरुवारपासून शहरातील १८ व जिल्ह्यातील २९५ पंपांवर सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल केवळ अत्यावश्यक सेवेकऱ्यांनाच मिळणारजिल्ह्यातील २९५ पंपांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू

कोल्हापूर : कोरोना विषाणूचे गांभीर्य न ओळखता विनाकारण चमकोगिरी करीत फिरणाºयांवर वचक बसावा, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाºया वाहनधारकांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे आदेश पंपचालकांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी गुरुवारपासून शहरातील १८ व जिल्ह्यातील २९५ पंपांवर सुरू करण्यात आली.गेल्या तीन दिवसांपासून देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो नियंत्रित आणण्यासाठी सरकारी यंत्रणेसह स्वयंसेवी संस्था रात्रीचा दिवस करीत आहेत.

यात गर्दी टाळा, एकमेकांचा संपर्क टाळा, नियमित कामे बंद करा, घरातच बसा असा संदेश विविध वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रांद्वारे आणि प्रसंगी वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून नागरी वस्त्यांमध्ये पोहोचविला जात आहे. तरीसुद्धा अनेक नागरिक वैद्यकीय, औषधे, अन्नधान्य, भाजीपाला अशी कारणे सांगून दुचाकी, चारचाकी काढून फिरत आहेत.

या सर्वांवर वचक निर्माण व्हावा, जेणेकरून नागरिक घराबाहेरच पडू नयेत, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील २९५ पंपचालकांना केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाच त्यांचे ओळखपत्र पाहूनच पेट्रोल, डिझेल देण्यास सांगितले आहे. त्यानुसार शहरातील १८ व जिल्ह्यातील २९५ पेट्रोल पंपांवर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अनेक नागरिकांना पेट्रोल पंपांवरूनच पंपातील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल मिळणार नाही; त्यामुळे रांगेत थांबू नका, अशा सूचना दिल्या. तरीसुद्धा अनेक नागरिक तेथेच घुटमळत असल्याचे चित्र शहरातील काही पेट्रोल पंपांवर होते.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल, डिझेल पंपचालकांना केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वाहनधारकांनाच इंधन पुरवठा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पंपचालक ओळखपत्र पाहूनच पेट्रोल, डिझेल देत आहेत. नागरिकांनीही या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे.- गजकुमार माणगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल, डिझेल डीलर्स असोसिएशन.

 

 

 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPetrol Pumpपेट्रोल पंपkolhapurकोल्हापूर