शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

corona in kolhapur - निम्मे भक्तिपूजानगर जुन्या घरात, ‘कोरोना व्हायरस’चा रुग्ण आढळल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 12:02 IST

मंगळवार पेठ, भक्तिपूजानगरातील निम्मे रहिवाशी गुजरी, आझाद गल्ली, बाबुजमाल परिसर येथील जुन्या घरांत तसेच नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. कोरोना व्हायरसचा रुग्ण परिसरात आढळून आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या येथे राहात असणाऱ्यांना मात्र, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.

ठळक मुद्दे निम्मे भक्तिपूजानगर जुन्या घरात, ‘कोरोना व्हायरस’चा रुग्ण आढळल्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंपासून परिसर वंचित

कोल्हापूर : मंगळवार पेठ, भक्तिपूजानगरातील निम्मे रहिवाशी गुजरी, आझाद गल्ली, बाबुजमाल परिसर येथील जुन्या घरांत तसेच नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. कोरोना व्हायरसचा रुग्ण परिसरात आढळून आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या येथे राहात असणाऱ्यांना मात्र, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.कोरोना व्हायरसचा कोल्हापुरातील पहिला रुग्ण मंगळवार पेठेतील भक्तिपूजानगरामध्ये आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील रहिवाशी मूळचे गुजरी, महाद्वार रोड, आझाद गल्ली परिसर, बाबूजमाल तालीम परिसर, तटाकडील तालीम, पुष्कराज तरुण मंडळ या परिसरातील आहेत.

येथे जागा अपुरी असल्यामुळे भक्तिपूजानगरामध्ये यामधील काहींनी प्लॅट, बंगले बांधले. आता कोराना व्हायरसचा रुग्ण परिसरात आढळून आल्यामुळे त्यांनी पुन्हा शहरातील मध्य वस्तीमध्ये असणाºया जुन्या घरांत राहण्यासाठी जाण्याची वेळ आली आहे.

या भक्तिपूजानगरातील निम्म्या घरांना रविवारी कुलूप असल्याचे आढळून आले. महापालिकेच्या आरोग्य पथकाने परिसरात सर्वेक्षण मोहीम सुट्टीदिवशीही सुरू ठेवली.

नावालाच सीमा बंदजिल्हा प्रशासनाने भक्तिपूजानगरातील ५०० मीटर क्षेत्र ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. या अंतरावरील सर्व परिसरांतील सीमा बंद करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र, शाहू दयानंद हायस्कूल तसेच ओढ्यावरील रेणुका मंदिर परिसरातील मार्ग खुला आहे. येथून बहुतांशी नागरिक ये-जा करीत आहेत.

जीवनावश्यक वस्तूसाठी पायपीठभक्तिपूजानगरमध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळल्याचे वृत्त सर्वत्र पसरले असून, या परिसरात दूध, वर्तमानपत्र, भाजीपाला घेऊन येणाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. यापूर्वी परिसरात भाजी विक्रेते व्यवसाय करीत होते. मात्र, तीन दिवसांपासून त्यांनी येथे व्यवसाय करणे बंद केले आहे.

सध्या येथे राहात असणारे घरात थांबून आहेत. कोणीही बाहेर येत नसून परिसर सामसूम झाला आहे. यापूर्वी घराच्या जवळपास भाजीपाला मिळत होता. आता मात्र, विके्रते कोणीही नाही. वर्तमानपत्र टाकणारेही येणे टाळले आहे. दूध आणण्यासाठीही लांब जावे लागत आहे.आशिष ओसवाल, भक्तिपूजानगर

सध्या रहिवाशी असणारा परिसर

  • भक्तिनगर -३६ प्लॅट
  • पूजानगर-२८ प्लॅट
  • पद्मावती कॉलनी-३0 बंगले

 

वारे वसाहत, पद्माळा परिसरात सर्वेक्षणमहापालिका प्रशासनाने भक्तिपूजानगरातील ३ किलोमीटर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सर्वेक्षण सुरू केले आहे. विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांच्या मागदर्शनाखाली येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच वारे वसाहत, पद्माळा या परिसराची सर्वेक्षण मोहीमही घेण्यात आली.

सर्वेक्षण करण्यात आलेली घरे लोकसंख्या

  • वारे वसाहत- २९५ १४६0
  • पद्माळा - १00 ६७0
  • एकूण ३९५ २१३0

 

  • पुण्याहून आलेली व्यक्ती-१

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर