शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -कोरोना रुग्णसंख्येत शाहूवाडी सगळ्यात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 17:10 IST

कोल्हापूर जिल्ह्यात आजच्या घडीला रुग्णसंख्येत शाहूवाडी तालुका सगळ्यात पुढे आहे. या तालुक्यातील १० रुग्ण आतापर्यंत सापडले असून हे सर्व मुंबईहून आलेले आहेत.

ठळक मुद्देकोरोना रुग्णसंख्येत शाहूवाडी सगळ्यात पुढेकरवीर व गगनबावडा सुरक्षित

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यात आजच्या घडीला रुग्णसंख्येत शाहूवाडी तालुका सगळ्यात पुढे आहे. या तालुक्यातील १० रुग्ण आतापर्यंत सापडले असून हे सर्व मुंबईहून आलेले आहेत.शाहूवाडीसह चंदगड, आजरा, भुदरगड या तालुक्यांचा मुंबईशी फार संपर्क आहे. या तालुक्यांतील अनेक गावांची अर्थव्यवस्थाच मुंबईशी जोडलेली आहे. त्यामुळे याच तालुक्यात मुंबईहून येणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे.

या चार तालुक्यात आता सुमारे २७ रुग्णसंख्या आहे. म्हणजे एकूण रुग्णातील ४८ टक्के रुग्ण या तालुक्यातील आहेत.गूड न्यूज : समूह संसर्ग नाहीकोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी दोन गोष्टी अजूनही चांगल्या आहेत. एक म्हणजे कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या मर्यादित आहे. आतापर्यंत कोल्हापुरात फक्त एकच इचलकरंजी येथील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यांनाही अन्य आजारांची लागण झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला लवकर बळी पडले.

दुसरे म्हणजे ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे ते सर्व बाहेरून आलेले आहेत. प्रवासामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजूनही चांगली बाब म्हणजे स्थानिक पातळीवर कुठेही समूह संसर्गातून लागण झालेली नाही. आताही ज्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांची वेळेत तपासणी झाली आहे.करवीर व गगनबावडा सुरक्षितजिल्ह्यातील करवीर व गगनबावडा हे दोन तालुके सुरक्षित आहेत. या तालुक्यात अजून एकही रुग्ण सापडलेला नाही. या तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे व गावांनी कडक लॉकडाऊन केल्याचाही परिणाम असू शकतो. कसबा बावड्यासह कोल्हापूर शहरही तसे करवीर तालुक्यातच येते परंतु त्यांचे स्वतंत्र अस्तित्व विचारात घेतल्यास करवीर तालुक्यात रुग्ण आढळून आलेला नाही.

लॉकडाऊनच्या काळात कोल्हापुरात लोकांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे लॉकडाऊन यशस्वी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. कोल्हापूर समूह संसर्ग रोखण्यात आतापर्यंत यशस्वी झाला आहे हे त्याचेच महत्त्वाचे कारण आहे.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी कोल्हापूर

कोरोना सांख्यिकी माहिती, कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती

  • एकूण रुग्ण : ५८
  • बरे झालेले रुग्ण : १३
  • उपचार घेणारे : ४४
  • मृत्यू : ०१
  • एकूण तपासणी केंद्रे : २०
  • सोमवारपर्यंत घेतलेले स्राव : १११९५
  • तपासणी अहवाल प्रलंबित : ५८७७सोमवार दुपारी २ वाजेपर्यंतची तालुकानिहाय रुग्णसंख्या : ५८ 
  • शाहूवाडी : १०
  • भुदरगड : ०७
  • राधानगरी : ०७
  • कोल्हापूर शहर (कसबा बावडासह) : ०६
  • आजरा : ०६
  • चंदगड : ०४
  • पन्हाळा : ०४
  • शिरोळ :०४
  • इचलकरंजी : ०३
  • हातकणंगले : ०१
  • गडहिंग्लज : ०१
  • कागल : ०१
  • कर्नाटक व तमिळनाडूला निघालेले : ०४
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर