शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गाचा वेग ओसरला, मृत्यूही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

कोल्हापूर: कडक लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून वाढत चाललेल्या रुग्णसंख्येला व मृत्यूसंख्येला रविवारी तब्बल आठ दिवसांनी काहींसा ब्रेक लागला. नवे १७५९ ...

कोल्हापूर: कडक लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून वाढत चाललेल्या रुग्णसंख्येला व मृत्यूसंख्येला रविवारी तब्बल आठ दिवसांनी काहींसा ब्रेक लागला. नवे १७५९ नवे बाधित आढळले, तर मृत्यूसंख्याही ३७ पर्यंत खाली आली. अजूनही शहरातील रुग्णसंख्या सर्वाधिक ४७७ इतकी आहे. दरम्यान, रविवारी कोरोना चाचणीचे नवीन मशिन दाखल झाल्याने आजपासून चाचणीची संख्या वाढणार आहे.

गेले आठवडाभर सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने कोल्हापूरकरांच्या पोटात भीतीचा गोळा आला होता. अडीच हजारांवर रुग्णसंख्या गेली, तर मृत्यूनीही रोजची अर्धशतकाची संख्या कायम राखली होती. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने हा आकडा वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. रविवारी मात्र या सर्व वाढीला थोडासा ब्रेक लागला. दोन हजारांवर असणारी रुग्णसंख्या एकदम दोनशे ते तीनशेने खाली आली. नव्याने आढळलेल्या रुग्णात इतर जिल्ह्यातील १११, तर जिल्ह्यातील १६४८ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारी १५५९ कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

चौकट

शहरात अजूनही वाढच

कोल्हापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही ४७७ इतकी सर्वाधिक आहे. त्याखालोखाल करवीरची ३३६, तर हातकणंगलेची २०३ इतकी आहे.

चौकट

करवीरमध्ये सर्वाधिक मृत्यू

मृत्यूमध्ये झालेल्या ३७ पैकी ७ हे इतर जिल्ह्यांतील आहेत. तेही एकटे बेळगाव जिल्ह्यातील आहेत, हे विशेष. जिल्ह्यातील मृत्यू ३० आहेत, त्यातही सर्वाधिक ९ करवीर, तर हातकणंगले तालुक्यातील ७ जण आहेत.

जिल्ह्यातील आजचे मृत्यू:

पन्हाळा: बोरिवडे, माले

करवीर: ०९ पाचगाव,कणेरी, दऱ्याचे वडगाव,वाशी, कांडगाव, पाचगाव, मणेरमळा उचगाव, शिंगणापूर,

कोल्हापूर शहर: ०४ शुगर मिल कसबा बावडा, ताराबाई पार्क, महाडीक कॉलनी, राजोपाध्येनगर,

इचलकरंजी: ०३ शास्त्री सोसायटी, शेळके मळा, जवाहरनगर,

हातकणंगणे: ०७ अंबप, कबनूर, यळगुड, माणगाव, कुंभोज, भादोले, नागाव,

कागल:०४ सणगर गल्ली, बाचणी, हासूरखुर्द, मुरगुड,

भूदरगड: ०१ वेसर्डे गारगोटी,

आजरा: ०१ उत्तूर,

इतर जिल्हा: खानापूर बेळगाव, चिक्कोडी, सदलगा, ममदापूर, नेज