corona cases in kolhapur : पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 08:28 PM2021-05-21T20:28:21+5:302021-05-21T20:30:52+5:30

corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या दरम्यान पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा कोरोमुक्तांची संख्या अधिक झाली आहे. जिल्ह्यात नवे १३३७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून १४५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

corona cases in kolhapur: more corona free than positive patients | corona cases in kolhapur : पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

corona cases in kolhapur : पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

Next
ठळक मुद्देपॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक हलकासा दिलासा : नवे १३३७ रूग्ण, ३८ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या दरम्यान पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा कोरोमुक्तांची संख्या अधिक झाली आहे. जिल्ह्यात नवे १३३७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून १४५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.


गेल्या दीड महिन्यामध्ये जिल्ह्यात कोरोनाने उच्छाद मांडला असताना पहिल्यांदा पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. मृत्युही कमी होवून ३८ वर आले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २७२ रूग्ण कोल्हापूर शहरातील असून त्याखालोखाल करवीर तालुक्यात १८०, हातकणंगले तालुक्यात १५३, तर इतर जिल्ह्यातील १३१ नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत.

कोल्हापुरात केवळ दोनच मृत्यू

कोल्हापूर शहरातील केवळ दोनच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याआधी शहरातील मृतांची सख्या अधिक असायची. मात्र करवीर तालुक्यातील कोरोना मृतांचा आकडा कमी येत नाही.

 

  • करवीर ११

प्रयाग चिखली, पाचगाव २, कणेरी, कळंबा, सांगवडे, भामटे, गाडेगोंडवाडी, मणेरमळा, उजळाईवाडी, कंदलगाव

  • हातकणंगले ०६

हातकणंगले, रूकडी, चंदूर २, हालोंडी, हुपरी

  • इचलकरंजी ०५

शहापूर, जवाहरनगर, सुदर्शन चौक, कारंडे मळा, इचलकरंजी

  • शिरोळ ०३

टाकवडे, तेरवाड, शिरटी

  • पन्हाळा ०२

बोरवडे, पन्हाळा

  • कोल्हापूर ०२

शिवाजी पेठ, मंगळवार पेठ

  • गडहिंग्लज ०२

दुंडगे, गडहिंग्लज

  • राधानगरी ०१

खेरिवडे

  • आजरा ०१

सुळे

  • कागल ०१

सुळकुड

  • इतर ०४

रेठरे धरण वाळवा, तुंग, फोंडा घाट, कुडाळ

Web Title: corona cases in kolhapur: more corona free than positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.