शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यासाठी सध्याच्या लागू निर्बधांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 19:35 IST

CoronaVirus Kolhapur :  कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यासाठी 7 जून 2021 पासून स्तर-4 अंतर्गंत लागू केलेल्या निर्बंधांना पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्ह्यासाठी सध्याच्या लागू निर्बधांना मुदतवाढजिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय

कोल्हापूर :  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यासाठी 7 जून 2021 पासून स्तर-4 अंतर्गंत लागू केलेल्या निर्बंधांना पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा 11 ते 17 जून 2021 या सप्ताहातील सरासरी पॉझिटिव्हीटी रेट हा 10 टक्क्यांपेक्षा जास्त परंतु 20 टक्क्यांच्या आत आहे. ऑक्सिजन बेड्स व्यापल्याची टक्केवारी 60 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने कोल्हापूर जिल्हा निर्बंध स्तर-4 मध्ये अंतर्भूत होत आहे.कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायोजनेअंतर्गत साथरोग कायदा 1897, कलम 2 नूसार, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदी नूसार त्या त्या जिल्ह्यातील कोविड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापल्याच्या टक्केवारी नुसार एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले होते. त्या त्या स्तरानुसार संबंधीत जिल्ह्यामध्ये निर्बंध लागु करणे अथवा सुट देण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.या नुसार कोल्हापूर जिल्ह्यात स्तर-4 चे निर्बंध लागू असल्याने, विविध बाबी, हालचाली व आस्थापनांना 7 जून 2021 रोजी पासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत.साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील अधिकारांस अनुसरून, कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी देण्यात आलेल्या आदेशास पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. निर्बंधाचे स्तर निश्चित करण्याबाबत कार्यपध्दती1. राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग दर गुरुवारी वापरातील ऑक्सिजन बेडची टक्केवारी व कोविड पॉझीटीव्हीटी रेट जिल्हानिहाय जाहिर करेल. तदनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याबाबतचा निर्णय घेईल, त्या प्रमाणे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निर्बंधांची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत जाहीर करेल.2. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर नमुद केलेल्या मानकाप्रमाणे, आपल्या कार्यक्षेत्रातील विविध प्रशासकीय घटकांसाठी या मानकाप्रमाणे एकमत झाल्यानंतर राज्य स्तरीय ऑक्सिजन ट्रिगरच्या अधिन राहून व असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रामध्ये कोणत्या स्तरावरील निर्बंध लावले जाईल याचा निर्णय घेईल.3. निर्बंध पातळीवर काही बदल झाल्यास पुढील सोमवार पासून सुधारीत निर्बंध अंमलात येतील.आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर