शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

corona cases in kolhapur : महापालिका वॉररूमतर्फे दीड हजार रुग्णांना बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 16:43 IST

CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूर महापालिकेच्या वॉररूममधून शहरातील व ग्रामीण भागातील दीड हजार कोरोनाबाधित नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये खासगी रुग्णालयांसह कोरोना केअर सेंटरमधील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व नॉन ऑक्सिजन बेडचाही समावेश आहे. यावरूनच या वॉररूमची उपयुक्तता सिद्ध झाली.

ठळक मुद्देमहापालिका वॉररूमतर्फे दीड हजार रुग्णांना बेडऑक्सिजन सिलिंडरचाही पुरवठा

कोल्हापूर : महापालिकेच्या वॉररूममधून शहरातील व ग्रामीण भागातील दीड हजार कोरोनाबाधित नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये खासगी रुग्णालयांसह कोरोना केअर सेंटरमधील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व नॉन ऑक्सिजन बेडचाही समावेश आहे. यावरूनच या वॉररूमची उपयुक्तता सिद्ध झाली.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्‍याने रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे रुग्णांना बेडसाठी विविध रुग्णालयांत फिरायला लागू नये, त्यांना तत्काळ बेड मिळावेत म्हणून महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने दि. ७ एप्रिलपासून वॉररूम सुरू केली आहे. शहरातील नागरिकांना सरकारी व खासगी रुग्णालयातील रिक्त बेडची माहिती येथे २४ तास उपलब्ध होते. ही सुविधा कोरोना रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. एका फोनवर त्यांना शिल्लक बेडची माहिती मिळत आहे. यामुळे वेळेवर उपचार होत असल्याने कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी हा विभाग एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे.कोल्हापूरसह पुणे, मुंबई, कर्नाटकवरूनही फोन येत आहेत. वॉररूममध्ये आजपर्यंत दोन हजार नागरिकांनी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड व हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी बेड उपलब्धतेसाठी संपर्क साधला आहे. यापैकी सरकारी व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये तसेच कोविड काळजी केंद्र यांच्याबद्दल बेड उपलब्धतेची माहिती दिली गेली.ऑक्सिजन सिलिंडरचाही पुरवठामहानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांच्या मदतीने दहा साखर कारखान्यांकडून त्यांच्याकडील ८० ऑक्सिजन सिलिंडर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत अधिग्रहित केली आहेत. खासगी अथवा सरकारी रुग्णालयांकडील ऑक्सिजनचा साठा कमी पडल्याची माहिती वॉररूमकडे प्राप्त होते. यावेळी तातडीने या दवाखान्यांना त्यांचा साठा येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजनची सिलिंडर दिली जातात.वॉररूमची अशीही सामाजिक बांधीलकीग्रामीण भागातील एक गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तिला शहरात कोठेही दाखल करून घेतले जात नव्हते. ती शहरातील एका हॉस्पिटलच्या दारात सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत गेटवर दाखल होण्यासाठी थांबली होती. परंतु, तेथेही दाखल करून घेतले नाही. त्या महिलेच्या नातेवाइकांनी महापालिकेच्या वॉररूमला बेड पाहिजे असल्याचे कळविले. तातडीने महापालिकेच्या पथकाने त्या महिलेला खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिला. महिलेची प्रसूती होईपर्यंत महापालिकेचे पथक तेथून बाहेर पडले नाही. सध्या महिला कोरोनामुक्त असून, तिचे नवजात बाळही सुखरूप आहे.वॉररूम फोन नंबर्स

  • ०२३१- २५४५४७३
  • ०२३१ - २५४२६०१.
  • या नंबरवर संपर्क केल्यास कोणत्या रुग्णालयामध्ये कोविड उपचारासाठी बेड उपलब्ध आहेत याची माहिती दिली जाते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर