शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! भटक्या श्वानांमध्ये आला कोरोना कॅनाइन डिस्टेंपर, कोल्हापुरात पंधरा दिवसांत अनेक श्वानांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 14:11 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात भटक्या श्वानांमध्ये सध्या कॅनाइन डिस्टेंपर या कोरोनासारख्या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. गेल्या १५ ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात भटक्या श्वानांमध्ये सध्या कॅनाइन डिस्टेंपर या कोरोनासारख्या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. गेल्या १५ दिवसांतच रस्त्यावरील अनेक भटक्या श्वानांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याचे प्राणिमित्र धनंजय नामजोशी यांनी सांगितले.श्वानांमध्ये या आजाराची सर्दी किंवा ताप हे प्राथमिक लक्षणे आहेत. सर्दी तापानंतर न्यूमोनिया होऊन श्वान दगावत आहेत. खोकला आणि तोंडातून रक्त पडणे असे प्रकार श्वानांमध्ये आढळत आहेत. सर्दी, तापामुळे श्वास घेण्यात अडचणी येतात. परिणामी, अंग थरथर कापत असल्याची लक्षणे श्वानांमध्ये आढळत आहेत.पशुवैद्यकीयतज्ज्ञ डॉ. अनिल पाटील व डॉ. राहुल पोवार यांच्याकडे अशा प्रकारची लक्षणे असलेले अनेक श्वान आणले जात आहेत. त्यांच्याकडे तपासणीसाठी आणलेल्या १३ श्वानांना आधीच कॅनाइन डिस्टेंपर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.एकमेकांच्या संपर्कात आल्याने फैलावहा आजार भटक्या श्वानांमध्ये एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो. लाळेतून व वास घेतल्याने आजाराचा फैलाव होतो. अशा अवस्थेत श्वानाला फिट्स येणे, डोक्यात प्रचंड वेदना होणे असे त्रास होतात. त्यामुळे श्वान निपचित पडून शेवटचे श्वास घेत राहतात. प्रतिकारशक्ती कमी असलेले श्वान मृत्युमुखी पडतात.पाळीव श्वानांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण कमी आहे, कारण ते बाहेरील भटक्या श्वानांच्या संपर्कात येत नाहीत. याशिवाय त्यांचे संपूर्ण लसीकरण केले असल्यामुळे कॅनाइन डिस्टेंपर होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.हे कराभटक्या श्वानाला कॅनाइन डिस्टेंपर या जीवघेण्या आजारापासून वाचवण्यासाठी तातडीने 'नाईन इन वन किंवा सेव्हन इन वन' ही लस तातडीने द्या, असे आवाहन प्राणिमित्र धनंजय नामजोशी यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdogकुत्रा