शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

कोयनेचे दरवाजे साडे पाच फुटावर आणले, विसर्ग केला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 14:05 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी होत असल्याने कोयना धरणाचे दरवाजे मंगळवारी सकाळी दीड फुटाने कमी करुन साडे पाच फुटांवर ठेवण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे. सध्या सहा दरवाजे आणि पायथा वीजगृहातून २५७०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देकोयनेचे दरवाजे साडे पाच फुटावर आणलेविसर्ग कमी करण्यात आला : पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी होत असल्याने कोयना धरणाचे दरवाजे मंगळवारी सकाळी दीड फुटाने कमी करुन साडे पाच फुटांवर ठेवण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे. सध्या सहा दरवाजे आणि पायथा वीजगृहातून २५७०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे नदीतील पाणीपातळी टिकून आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या २३ दिवसांपासून पाऊस पडू लागला आहे. या पावसाचा जोर कमी होत असलातरी धरणात पाणीसाठा वाढू लागला आहे. कोयना, कण्हेर, तारळी यासह मोठ्या धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. कोयना धरण परिसरात पाऊस सुरूच असल्याने शनिवारी धरणाचे सहा दरवाजे पाच फुटांपर्यंत उचलण्यात आले होते.

रविवारी दुपारी बाराला दरवाजे सहा फुटापर्यंत उचलण्यात आले. तर सोमवारी सकाळी ११ ला धरणाचे दरवाजे आणखी एका फुटाने उचलण्यात आले. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे सात फुटांवरुन साडेपाच फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. त्यातून २३६०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पायथा वीजगृहातूनही २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

जिल्ह्यातील धोम वगळता इतर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कण्हेरमध्ये मंगळवारी सकाळी ८.४७ टीएमसी साठा होता. धरणातून ३४३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. बलकवडी धरणातही ३.४४ टीएमसी पाणीसाठा असून ९४३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तारळीतील साठा ५.८१ टीएमसी असून २१७२ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नीरा देवघर धरण परिसरात ८ मिलीमीटर पाऊस झाला असून साठा ९.४८ टीएमसी आहे. वीर धरणात ९.१९ टीएमसी पाणीसाठा असून ६८२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्येधोम २१ (४८१)कोयना ३८ (३२९६)बलकवडी ११ (१७६८)कण्हेर ०१ (५६५)उरमोडी ०३ (८४९​​​​​​​)तारळी १२ (१५६४​​​​​​​​​​​​​​)

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर