शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

थंड कोल्हापूरचा पारा चढला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:57 IST

कोल्हापूर : चोहोबाजूंनी वाहणाऱ्या नद्या, जैवविविधता आणि वृक्षांची हिरवी दुलई या वैशिष्ट्यांमुळे एकेकाळी थंड असलेल्या कोल्हापूरचा पारा गेल्या दोन-तीन वर्षांत चांगलाच वाढला आहे. रस्ते रुंदीकरण आणि सिमेंटची जंगलं उभारण्यासाठी झाडांचीच समिधा दिली गेली आणि आता उन्हाच्या तीव्र झळा सोसताना यंदा ऊन किती वाढलंय यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.कोल्हापूरला लाभलेल्या निसर्गाच्या ...

कोल्हापूर : चोहोबाजूंनी वाहणाऱ्या नद्या, जैवविविधता आणि वृक्षांची हिरवी दुलई या वैशिष्ट्यांमुळे एकेकाळी थंड असलेल्या कोल्हापूरचा पारा गेल्या दोन-तीन वर्षांत चांगलाच वाढला आहे. रस्ते रुंदीकरण आणि सिमेंटची जंगलं उभारण्यासाठी झाडांचीच समिधा दिली गेली आणि आता उन्हाच्या तीव्र झळा सोसताना यंदा ऊन किती वाढलंय यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.कोल्हापूरला लाभलेल्या निसर्गाच्या वरदानामुळे या शहराला कधी तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे अन्य शहरांच्या तुलनेत उन्हाळ््याच्या चार महिन्यांतही कोल्हापूरचा पारा कधी ३५ ते ३६ डिग्री सेल्सिअसवर गेला नाही. पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तींच्या तोंडून ‘कोल्हापूर किती थंड आहे’, हे वाक्य हमखास ऐकायला मिळायचे. मात्र, कोल्हापूरचा रस्ते रुंदीकरणाचा प्रकल्प जणू या थंड कोल्हापूरच्या मुळावर उठला.तेव्हापासून या शहराचा पारा वर्षागणिक दोन-तीन डिग्री सेल्सिअसने वाढू लागला. यंदा या उन्हाने एप्रिल महिन्यातच ४१ ते ४२ डिग्री सेल्सिअसचा टप्पा गाठलाआहे. आताच अशी स्थिती आहे, तरमे महिन्यात कसे होणार, या विचारानेही पुन्हा पारा चढण्याची वेळ आली आहे.तापमानवाढीच्या चर्चेत ग्लोबल वॉर्मिंगचा नेहमी उल्लेख होतो. मात्र, प्रादेशिक आणि स्थानिक वातावरणाचा फार मोठा परिणाम सर्व ऋतूंवर होतो. कोल्हापूर शहरातील रस्त्यालगतची दोन हजार झाडे रस्ते रुंदीकरणात कापली गेली. त्याच्या दुप्पट वृक्ष लावून ते जगवण्यात स्थानिक प्रशासन आणि नागरिकही कमी पडले. अजूनही अनेक कारणांनी सर्रास झाडं तोडली जातात. तुलनेने उपनगरांत अजूनही झाडे असल्याने राहणाºया नागरिकांना किमान परिसरात तरी फार उकाडा जाणवत नाही.गेल्या काही वर्षांत जुन्या कोल्हापूरची वाटचाल मुंबई-पुण्यासारख्या सिमेंटच्या जंगलांच्या दिशेने सुरू झाली आहे. परिसरातील लहान-मोठ्या डोंगरांवरील झाडे गेली, परिसराचे सपाटीकरण झाले आणि उंचच उंच इमारती तयार झाल्या. याचाही फार मोठा परिणाम तापमानवाढीमध्ये झाला आहे. साडेदहा-अकरा वाजताही घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याने दुपारी बारा ते दुपारी चार या वेळेत रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे.झाडं लावू नका, जगवाकोल्हापूरच्या या वातावरण बदलाबाबत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जय सामंत म्हणाले, तापमानवाढीला स्थानिक नागरिक म्हणून आपण सर्वस्वी जबाबदार आहोत. झाडे उन्हाची तीव्रता कमी करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत शहरात झालेल्या बेसुमार वृक्षतोडीने आणि सिमेंटच्या इमारतींमुळे ही वेळ आली आहे. उन्हाळा सुसह्य करायचा असेल, तर झाडं नुसती लावू नका तर जगवा. प्रत्येकाने किमान आपल्या दारात दोन झाडे लावून ती जगवली तरी खूप आहे.