शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Kolhapur News: गोविंद पानसरे हत्या प्रकरणी दहा संशयितांवर दोषनिश्चिती, सुनावणीला वेग येणार; पुढील सुनावणी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 18:18 IST

समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाचा कट आणि खून केल्याप्रकरणी कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश (तिसरे) एस. एस. तांबे यांच्यासमोर सोमवारी (दि. ९) दहा संशयितांवर दोषनिश्चिती करण्यात आली. त्यात समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश आहे. दोषनिश्चिती झाल्यामुळे पानसरे खून खटल्याच्या सुनावणीला वेग येणार असून, पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे.अटकेतील दहा संशयितांपैकी सहा संशयित बंगळुरू येथील कारागृहात होते, तर तीन संशयित पुण्यातील येरवडा कारागृहात होते. पोलिस बंदोबस्तात संशयितांना कोर्टात हजर करण्यात आले. समीर गायकवाड याला यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. पानसरे यांचा खून झाल्यानंतर एसआयटीने तपास करून १२ संशयितांवर गुन्हा दाखल केला. एसआयटीच्या तपासानंतर हा गुन्हा एटीएसकडे वर्ग करण्यात आला असून, एटीएसकडूनही तपास सुरू आहे. दरम्यान, गुन्ह्यातील दहा संशयितांवर सोमवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषनिश्चिती करण्यात आली. न्यायाधीश तांबे यांनी सर्व संशयितांना आरोपांबद्दल विचारणा केली. मात्र, सर्व संशयितांनी आरोप नाकबूल केले. पुढील सुनावणीमध्ये गुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदारांची यादी सादर केली जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. संशयितांवर दोषनिश्चिती झाल्यामुळे खटल्याच्या कामकाजाला गती येईल, असा विश्वासही ॲड. राणे यांनी व्यक्त केला.आरोप नाकबूलन्यायाधीशांनी आरोपांबद्दल विचारणा करताच सर्व संशयितांनी आरोप नाकबूल केला. सुनावणीच्या सुरुवातीला संशयितांचे वकील समीर पटवर्धन उपस्थित नव्हते. त्यामुळे काही संशयितांनी वकिलांशी चर्चा करून दोषनिश्चितीच्या कागदांवर सही करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी न्यायाधीशांकडे केली. २० मिनिटांनी ॲड. पटवर्धन आल्यानंतर त्यांच्याशी संशयितांची चर्चा झाली. त्यानंतर संशयितांनी दोषनिश्चितीच्या कागदावर सह्या केल्या.दहा संशयित हजरसमीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली), वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (वय ४८, रा. पनवेल मुंबई), अमोल रवींद्र काळे (वय ३४, रा. पिंपरी, पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (वय २९, रा. जळगाव), भरत जयवंत कुरणे (वय ३७, रा. संभाजीगल्ली, बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (वय ३८, रा. कळणे, सिंधुदुर्ग), शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. दौलताबाद,औरंगाबाद), सचिन प्रकाश आंदुरे (वय ३२, रा. राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (वय २९, हुबळी धारवाड), गणेश दशरथ मिस्कीन (वय ३०, रा. चैतन्यनगर, धारवाड) हे संशयित न्यायालयात हजर होते.संशयितांची रवानगी कळंबा कारागृहातबंगळुरू येथून आणलेल्या संशयितांना पुन्हा सोडण्यासाठी रात्रीचा प्रवास करणे साेयीचे नाही, त्यामुळे सोमवारी रात्री संशयितांना कळंबा कारागृहात ठेवण्याची परवानगी विशेष सरकारी वकील राणे यांनी कोर्टाकडे मागितली. सीपीआरमधील वैद्यकीय तपासणीनंतर संशयितांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय