शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शिरढोणमधील विद्यालयाच्या इमारत दुरुस्तीचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:07 IST

शिरढोण (ता. शिरोळ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर. बी. विद्यालयाची इमारत धोकादायक बनल्याच्या कारणातून विद्यालय बंद आहे; त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देशिरढोणमधील विद्यालयाच्या इमारत दुरुस्तीचा वादखर्च कुणी करायचा हा तिढा : मालकी एकाची वापर ‘रयत’ संस्थेकडून

गणपती कोळीकुरुंदवाड  शिरढोण (ता. शिरोळ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर. बी. विद्यालयाची इमारत धोकादायक बनल्याच्या कारणातून विद्यालय बंद आहे; त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे.शाळा ‘रयत’ची आणि इमारत स्थानिक शिक्षण संस्थेची, त्यामुळे इमारत दुरुस्ती व देखभालीवरून वाद सुरूअसून, दोघांच्याही प्रतिष्ठेत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यातून गावात तेढ निर्माण होत आहे; त्यामुळे प्रतिष्ठेपेक्षा गाव व विद्यार्थी यांच्या हिताचा निर्णय घेण्याची गरज आहे.लोकसंख्या १0 हजार असलेल्या या गावात रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे. या विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंतचे सुमारे ६५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयाला स्वत:ची इमारतीची सोय व्हावी; यासाठी १९७९ साली दिवंगत रमजानशेठ बाणदार व भरमू बालिघाटे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांकडून एकरी लोकवर्गणी काढून शेतकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तीन मजली भव्य इमारत बांधण्यात आली.

शेतकरी शिक्षण संस्थेने ही इमारत रयत शिक्षण संस्थेला भाडेपट्टी स्वरूपात दिली. शासनाच्या अनुदानातून संस्थेला २००३ पर्यंत भाडे मिळत होते. भाडे रूपातील उत्पन्न बंद झाल्याने शाळेच्या इमारत दुरुस्ती, डागडुजीकडे शेतकरी शिक्षण संस्थेचे दुर्लक्ष झाले. परिणामी गेल्या सात-आठ वर्षांत इमारतीची पडझड सुरूआहे.

काहीवेळा वर्गात छताचा गिलावा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडला आहे; त्यामुळे इमारत दुरुस्त करण्याची मागणी पालकांतून होत होती. त्यातच आॅगस्टमध्ये आलेल्या महापुरात पहिला मजला पाण्यात गेल्याने इमारतीच्या सुरक्षिततेबाबत पालकवर्गातून अधिकच भीती व्यक्त केली गेल्याने पूर ओसरून महिना उलटला, तरी शाळा बंदच आहे.शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दस्तगीर बाणदार यांनी इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून अहवाल येईपर्यंत इमारतीत शाळा भरवू नये, वर्ग भरविल्यास आणि काही दुर्घटना झाल्यास आपण जबाबदार असाल, अशा आशयाचे पत्र मुख्याध्यापकांना दिल्याने शिक्षकांनी जबाबदारी नाकारत शाळेचे वर्ग इतरत्र भरवले आहेत; त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचे गोंधळ होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.इमारत शेतकरी शिक्षण संस्थेच्या मालकीची असल्याने दुरुस्तीसाठीचा खर्च करण्यास रयत शिक्षण संस्थेने असमर्थता दाखविली आहे, तर रयत शिक्षण संस्थाच इमारत वापरत असल्याने दुरुस्ती देखभाल त्यांनीच करावी, अशी भूमिका शेतकरी शिक्षण संस्थेने घेतल्याने या वादात विद्यार्थी व शिक्षकांची हेळसांड होत आहे.

पालकांनीही इमारत रयत शिक्षणकडे देण्याची मागणी केल्याने दोन गट निर्माण होऊन गावात वाद निर्माण झाला आहे; त्यामुळे प्रतिष्ठा, स्वार्थ बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शेतकरी शिक्षण व रयत शिक्षण संस्थेने सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज आहे.जिल्हाधिकारी १५ ला करणार पाहणीरयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी विद्यालय इमारतीची पाहणी करून पालकांशी चर्चा केली. याची माहिती प्रा. पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिली; त्यामुळे जिल्हाधिकारी देसाई इमारतीच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी रविवारी (दि. १५) येणार असल्याची माहिती प्रा. पाटील यांनी दिली. 

 

टॅग्स :Rayat Educational Instituteरयत शिक्षण संस्थाkolhapurकोल्हापूर