शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

एचएसआरपी नंबर प्लेट जोडणीला वादाची फोडणी, काही केंद्रांनी यादीतून हटवले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:22 IST

अतुल आंबी इचलकरंजी : शहरातील विविध दुचाकी शोरूममध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवायला गेल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटत ...

अतुल आंबीइचलकरंजी : शहरातील विविध दुचाकी शोरूममध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवायला गेल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटत आहे. जुन्या गाड्यांना नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी लागणारा साचा तसेच अन्य खर्च कोण घालणार, यावरून ग्राहक व जोडणी केंद्र यांच्यात दररोज वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे काही प्रमुख दुचाकी शोरूमनी जोडणी केंद्राच्या ऑनलाइन यादीतून आपले नाव हटविले आहे. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत योग्य खुलासा करण्याची मागणी होत आहे.सन २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी वाहनधारक ऑनलाइन बुकिंग करत आहेत. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना त्यामध्ये नवनवीन अडचणी निर्माण होत आहेत. अनेकांना ऑनलाइन नोंदणी करता येत नसल्याने ते खासगी केंद्रांवर नोंदणी करण्यासाठी जातात. त्या वाहनधारकांकडून बुकिंगसाठी १०० ते २०० रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

५३१ रुपये भरल्यानंतर संबंधित वाहनधारकाला केंद्र व जोडणी तारीख दिली जाते. परंतु, प्रत्यक्षात केंद्रावर परिस्थिती वेगळीच असते. तेथे गेल्यानंतर जुन्या दुचाकीला नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी अन्य संच (ब्रॅकेट) बसवावे लागते. त्याचा खर्च हा संबंधित वाहनधारकाने द्यावा, अशी मागणी केंद्रचालकाकडून होते. परंतु, ग्राहक अन्य खर्च देण्यास तयार नाहीत.५३१ रुपयांमध्ये काहीही करून नंबर प्लेट बसवून द्या. तो तुमचा प्रश्न आहे, असे सांगत आहेत. जोडणी केंद्राला एका नंबर प्लेटमागे ५० रुपये मिळतात. त्यामध्ये अन्य साहित्य जोडावे लागल्यास त्याचा खर्च १०० ते २५० रुपयांपर्यंत जातो. तो कोण घालणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.या कारणावरून ग्राहक व केंद्रचालक यांच्यात दररोज वादविवाद होत असून, काही केंद्रचालकांनी ऑनलाइन नोंदणी यादीतून आपल्या केंद्राचे नाव हटविले आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा अडचणी येणार आहेत. यात शासनाने लक्ष घालून योग्य मार्ग काढावा आणि तसा खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.

नंबर प्लेट जोडणीसह ऑनलाइन ५३१ रुपये भरले असताना बोरगावे टीव्हीएस या जोडणी केंद्रावर ब्रॅकेटचा खर्च सोडून अधिकचे १०० ते २०० रुपये मागितले जात आहेत. ते न दिल्यास जोडणी परवडत नसल्याचे सांगत ग्राहकांना उद्धट उत्तरे दिली जात आहेत. - उमेश दुधाणे, ग्राहक 

नवीन नंबर प्लेट जोडणीसाठी ५३१ रुपयांमधून फक्त ५० रुपये जोडणी केंद्राला दिले जातात. त्यामध्ये ब्रॅकेट अथवा अन्य साहित्य लागल्यास त्याचे पैसे कोण देणार, यावरून वाद होत असल्याने आम्ही दोन दिवसांपूर्वीच ऑनलाइन नोंदणी यादीतून आमच्या केंद्राचे नाव हटविले आहे. - राजू बोरगावे, जोडणी केंद्रचालक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार