शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या कचरागाड्यांवर क्यूआर कोडने नियंत्रण, गाडीचालकाला स्कॅन करणे बंधनकारक 

By समीर देशपांडे | Updated: March 4, 2024 11:46 IST

कोल्हापूरमध्ये सध्या जागोजागी हे क्यूआर कोड लावण्याची मोहीम सुरू

समीर देशपांडेकोल्हापूर : आमच्या भागात गेले आठ दिवस कचरा गाडी आली नाही, ही तक्रार करण्यासाठी आता वाव राहणार नाही. कारण, शहरामध्ये कचरा टाकणाऱ्याच्या टोपल्यांना आणि बाहेर संरक्षक भिंतीवरही क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. कचरा उठाव करणाऱ्या गाडीचालक किंवा मदतनिसांना बाहेर लावलेला क्यूआर कोड स्कॅन करणे बंधनकारक राहणार असून, त्या माध्यमातूनच या गाड्यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

कोल्हापूर शहराची वाढ झपाट्याने होत असून, सदनिकांची संख्याही वाढत आहे. परंतु अनेक ठिकाणांहून आमच्याकडे गेले चार-पाच दिवस कचरा गाडीच आली नाही, अशा तक्रारी येतात. बहुतांशी ठिकाणी कचरा गोळा करून ठेवण्यासाठी सोयही नसते आणि त्याची दुर्गंधीही सुटते. यावरून अनेकदा वादाचेही प्रसंग निर्माण झाले आहेत. राज्यातील अनेक शहरांमधील हा प्रश्न लक्षात घेऊन नगरविकास विभागानेच याबाबत राज्य पातळीवरून निविदा काढली आहे.आयटीसी कंपनीला या कामाचा ठेका मिळाला असून, कोल्हापूरमध्ये सध्या जागोजागी हे क्यूआर कोड लावण्याची मोहीम सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून या कामाला गती आली आहे.ज्या सदनिकेमध्ये कचरा गोळा करण्याची सोय आहे, अशा ठिकाणी सर्वांसाठी एकच क्यूआर कोड देण्यात आला आहे. तर ज्या ठिकाणी फ्लॅटधारक स्वत: येऊन खाली कचरा टाकत असेल, अशा ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक ओला आणि सुका कचरा असलेल्या टोपल्यांनाही क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. 

गाड्यांचे लोकेशन समजणार

कचरा संकलनासाठी गाड्या वेळेवर गेल्या आहेत की नाही, कुठले कचरा संकलन केले आहे आणि कुठले केलेले नाही, कोणती गाडी नादुरुस्त झाली आहे, या सगळ्याची इत्थंभूत माहिती या क्यूआर कोडच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला समजणार आहे. त्यामुळे आमच्याकडे कचरा गाडी आली नाही, या तक्रारीला आळा बसेल आणि ही सेवा अधिक प्रभावी होईल, असे महापालिका प्रशासनाला वाटते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर