शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या नाक्यांवर आता सीसीटीव्हींचा ‘वॉच’ वृक्षतोडीवरही नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 21:58 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे महामार्गावरून होणारी लाकूड वाहतूक व कर्मचाºयांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे तसेच रस्त्यावरून जाणाºया संशयास्पद वाहतूक व हालचालींना या

ठळक मुद्देचोरट्या वाहतुकीस आळा -कर्मचाऱ्यांवरही वचक राहणार

राजाराम कांबळे ।मलकापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे महामार्गावरून होणारी लाकूड वाहतूक व कर्मचाºयांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे तसेच रस्त्यावरून जाणाºया संशयास्पद वाहतूक व हालचालींना या कॅमेरांद्वारे चाप बसणार आहे.

वनविभागाने करवीर, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, कागल या तालुक्यातील फुलेवाडी , साळवण, आंबा, बोरपाडळे , उचगांव, पाटणे, कागल, गैबी नाका आदी ठिकाणच्या चेकनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. ज्या ठिकाणी महामार्गावर व राज्य मार्गावर वनविभागाचे चेकनाके आहेत. या प्रत्येक नाक्यांवर एक किंवा दोन कर्मचाºयांची नियुक्ती असते.

या नाक्यांवरून भरून जाणारी लाकडाचे ट्रक यांच्याजवळ असणाºया पास आहे किंवा नाही याची तपासणी केली जाते. त्या पासवर शिक्का मारून गाडी पुढे सोडली जाते. नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसल्यामुळे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून होणारी चोरटी वृक्षतोडीची वाहतूक यावर नियंत्रण होणार आहे तसेच काही वनविभागाचे नाक्यावर ड्युटी असणारे कर्मचारी दिवसा थांबत नाहीत. अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या, सीसीटीव्हीमुळे कर्मचाºयांवर नजर ठेवली जाणार आहे .

लाकूड वाहतूक जेणेकरून रात्रीची होते. दिवसा हाताच्या बोटावर मोजण्याइतपत दिवसा लाकडाची वाहतूक होते. नाक्यावर जर नेमणूक पाहिजे असेल तर मोठा अर्थपूर्ण व्यवहार होऊन बदली होते. नाक्यावर असणारा कर्मचारी हा साहेबांच्या मर्जीतला असतो. जिल्ह्याच्या आठ ठिकाणी चेकनाक्यांवर कॅमेरे बसविले असल्यामुळे महामार्गावरील वाहनांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे . या सीसीटीव्ही कॅमेºयांची सर्व माहिती डिव्हीजन आॅफिसला सर्व माहिती कनेक्ट केली गेली आहे. त्यामुळे चेकनाक्यांवर चाललेली हालचाल सीसीटीव्ही कॅमेºयांतून कैद होणार आहे. त्यामुळे दिवसादेखील कर्मचाºयांना नाक्यावर ड्युटी बजवावी लागणार आहे. नाक्याच्या आतील व बाहेरील सर्व व्हिडिओ चित्रण विभागीय कार्यालयांतून बसविलेल्या टीव्हीत दिसणार असल्यामुळे चोरट्या वृक्ष वाहतुकीला आळा बसणार आहे. किंमती लाकडाची चोरटी वाहतूक रात्री होते.

वनविभागाचे चेकनाके राज्य व महामार्गावर आहेत. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. चोरी व लुटालूट करून जाणारे चोरटे या सीसीटीव्हीमध्ये सापडले जाणार आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासासाठी मदत होणार आहे. एखाद्या घटनेविषयी तातडीने पोलिसांना फुटेज पाहता येणार आहे . महामार्गावर होणाºया लूटमारीला आळा बसणार आहे.सीसीटीव्हीमुळे पोलिसांना मदत-वनविभागाने जिल्ह्याच्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावर आठ ठिकाणी चेकनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे महामार्गावर होणारी वाहनधारक, प्रवाशांची, लूटमार तसेच संशयितांच्या हालचाली व गुन्हेगारांना पकडणे सोयीस्कर ठरणार आहे. 

वनविभागाच्या चेकनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे नाक्यांत व नाक्यांबाहेर रस्त्यावर घडणाºया घटना व कर्मचाºयांच्या हालचालींवर नियंत्रण राहणार आहे तसेच चोरट्या लाकडाच्या वाहतुकीला आळा बसणार आहे.- प्रभुनाथ शुक्ल,उपवनसंरक्षक, वनविभाग कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागcctvसीसीटीव्ही