शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला सव्वाचार कोटींचा चुना, ठेकेदार लिंबेकरचा आणखी एक कारनामा

By समीर देशपांडे | Updated: June 25, 2025 15:43 IST

मुलुंड, वरळीच्या रुग्णालयाच्या बोगस दर कराराद्वारे मिळविले टेंडर

समीर देशपांडेकोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची एक-एक प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. येथील फरार ठेकेदार मयूर लिंबेकर याने आणखी एका प्रकरणात मुलुंड आणि वरळी येथील शासकीय रुग्णालयांचा बोगस दर करार दाखवून सव्वाचार कोटी रुपयांचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) टेंडर मिळवल्याचे उघडकीस आले आहे.लिंबेकर याने आधीच्या प्रकरणात मुलुंड येथील कामगार रुग्णालयाच्या बोगस दर करारपत्राच्या आधारे चार कोटी ८६ लाख रुपयांचे टेंडर मिळविले होते. निकृष्ट आणि प्रचंड महागड्या सर्जिकल साहित्याची खरेदी करून त्यातून शासनाची लूट करण्यात आल्याचे ‘लोकमत’ने १८, १९ आणि २० जुलैला उघडकीस आणले होते. यानंतरही लिंबेकरला शासन व्हावे यापेक्षा त्याला वाचवण्यासाठीच नेते, त्यांचे वजनदार कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे पाहावयास मिळाले. परंतु, पाठपुरावा सुरू ठेवल्याने अखेर चौकशी समिती, तिचा अहवाल, त्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या लिंबेकर फरार आहे.या प्रकरणाच्या कागदपत्रांची छाननी सुरू असताना हे दुसरे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मुलुंड आणि वरळी येथील कामगार आरोग्य रुग्णालयाचे दरकरारपत्र जोडण्यात आले असून, त्याआधारे चार कोटी २८ लाख रुपयांचे टेंडर मिळवण्यात आले आहे. ज्या पद्धतीने पहिली फाईल तयार करून काेट्यवधीची लूट केली, त्याच पद्धतीने ही दुसरीही फाईल तयार करण्यात आली असून, त्यानुसार साहित्य पुरवठा करून बिलेही काढण्यात आली आहेत.

‘लोकमत’कडून पुन्हा पर्दाफाशएका प्रकरणात बोगस कागदपत्रांच्या आधारे टेंडर मिळविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करेपर्यंत ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. परंतु, गेली दोन महिने लिंबेकर फरार असून, त्याने जामिनासाठी केलेला जिल्हा न्यायालयातील अर्ज फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले.