शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: धामणी मध्यम प्रकल्पातील कामात भूसुरुंगाचे स्फोट, घरांना गेले तडे; ग्रामस्थांतून संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 18:06 IST

तोंडी-लेखी तक्रार करूनही ठेकेदार कंपनी व शासनाच्या जलसंपदा विभागाकडून कोणतीही कारवाई नाही

महेश आठल्ये

म्हासुर्ली : राई (ता. राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामावर ठेकेदार कंपनी खडक फोडण्यासाठी शक्तीशाली भुसुरुंगाचा वापर करत आहे. परिणामी चौके - मानबेट परिसरातील अनेक घरांना तडे गेले आहेत. येथील नागरिक भीतीने हवालदिल झाले तर पाण्याच्या बोरवेल व जीवंत झऱ्याचे पाणी आटल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला. याबाबत ग्रामस्थ, ग्रामपंचायतीने तोंडी - लेखी तक्रार करूनही ठेकेदार कंपनी व शासनाच्या जलसंपदा विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. धामणी मध्यम प्रकल्पांतर्गत चौके - मांडकरवाडी गावांच्या बाजूने जाणाऱ्या सांडव्याचे काम सुरू आहे. येथील खडक फोडण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून शक्तिशाली भूसुरूंगाचा वापर अमर्यादीत प्रमाणात सुरु आहे. भूसुरुगांच्या हादऱ्याने गावातील घरांना तडे गेले आहेत.

झर्‍यांतुन येणारे पिण्याचे पाण्याचे स्रोत हे बंद झाले आहेत. त्यामुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. भूसुरूंगातून उडणाऱ्या प्रचंड धुळीच्या लोटामुळे परिसरातील शेत पिकांवर धुळीचा थर बसत आहे. परिणामी धुळीने माखलेला चारा खाऊन जनावरे आजारी पडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. 

भूसुरुंगाच्या मोठ्या आवाजामुळे वयोवृद्ध ग्रामस्थांसह लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक वेळा सुचना केल्या आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून संबंधीत कंपनीने यावर उपाय योजना कराव्यात. - संभाजी कांबळे, सरपंच , ग्रामपंचायत मानबेट

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरी