कोल्हापूर : अंशकालीन उमेदवारांबाबत शासन परिपत्रकानुसार विविध विभागांनी कंत्राटी रिक्त पदे भरतीबाबत अंमलबजावणी करावी. ज्या तालुक्याला ज्या ठिकाणी नियुक्ती मिळाली असेल त्याच ठिकाणी उमेदवारांनी काम करावे, विभागांनी जो उमेदवार नियुक्त केल्यानंतर हजर होत नसेल अथवा नाकारत असेल तर त्यास काळ्या यादीत टाकावे असे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.अंशकालीन उमेदवारांबाबत २०१९ व २०२० च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी रिक्त पदे भरतीबाबत अंमलबजावणी व रिक्त पदांच्या माहितीबाबत बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, तहसिलदार रंजना बिचकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, विभाग प्रमुखांनी रिक्त पदे भरताना अंशकालीन पदवीधर उमेदवारांमधून कंत्राटी पदे भरावीत. त्याबाबत पत्रव्यवहार करावा. ठेकेदारामार्फत पदे न भरता अंशकालीन पदवीधर उमेदवारांमधून पद भरती करण्याबाबत एस.एस.सी. मंडळाला पत्रव्यवहार करावा. कंत्राटी पदे ही बदलता येण्याजोगी नसल्याने ज्या ठिकाणी नियुक्ती मिळेल त्याच ठिकाणी उमेदवारांनी काम करावे. विभागांनीही भरतीप्रक्रिया राबवताना जो उमेदवार नियुक्त केल्यानंतर हजर होत नसेल अथवा नाकारत असेल तर त्यास काळ्या यादीत टाकावे अशा सुचनाही त्यांनी केल्या.
कंत्राटी उमेदवारांनी नियुक्तीच्या ठिकाणीच काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 17:54 IST
collector Kolhapur-अंशकालीन उमेदवारांबाबत शासन परिपत्रकानुसार विविध विभागांनी कंत्राटी रिक्त पदे भरतीबाबत अंमलबजावणी करावी. ज्या तालुक्याला ज्या ठिकाणी नियुक्ती मिळाली असेल त्याच ठिकाणी उमेदवारांनी काम करावे, विभागांनी जो उमेदवार नियुक्त केल्यानंतर हजर होत नसेल अथवा नाकारत असेल तर त्यास काळ्या यादीत टाकावे असे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
कंत्राटी उमेदवारांनी नियुक्तीच्या ठिकाणीच काम करावे
ठळक मुद्देकंत्राटी उमेदवारांनी नियुक्तीच्या ठिकाणीच काम करावेभरती प्रक्रिया राबवण्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे निर्देश