शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्रात प्रवेश सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:42 PM

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राकडील उर्वरित चार अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. आता एकूण १३ पैकी सर्वच १३ अभ्यासक्रमांना ही मान्यता मिळाली आहे. त्यातील एम. ए. इंग्रजी, एम. ए. अर्थशास्त्र, एम. एस्सी. (गणित), एम. कॉम. (व्हॅल्यूएशन आॅफ रिअल इस्टेट) या पदव्युत्तर विषयांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्रात प्रवेश सुरूआॅनलाईन प्रक्रिया; कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये ७७ केंद्रे

कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राकडील उर्वरित चार अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. आता एकूण १३ पैकी सर्वच १३ अभ्यासक्रमांना ही मान्यता मिळाली आहे. त्यातील एम. ए. इंग्रजी, एम. ए. अर्थशास्त्र, एम. एस्सी. (गणित), एम. कॉम. (व्हॅल्यूएशन आॅफ रिअल इस्टेट) या पदव्युत्तर विषयांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, आदी जिल्ह्यांतील ७७ अभ्यासकेंद्रांमध्ये विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सैनिक, उद्योजक, शेतकरी, कामगार व बंदीजन, आदी शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना प्रवेश घेता येणार आहे. संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज उपलब्ध आहे, अशी माहिती दूरशिक्षण केंद्राचे उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे यांनी दिली. संपूर्ण आॅनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत अभ्यासकेंद्रावर जमा करण्याची मुदत नियमित शुल्कासह दि. १ फेब्रुवारीपर्यंत, विलंब शुल्कासह दि. ९ फेब्रुवारी, तर दि. १५ फेब्रुवारीपर्यंत अतिविलंब शुल्कासह आहे. दूरशिक्षण केंद्राच्या चार अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असल्याने जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत, अशांनी सदर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा, असे आवाहन दूरशिक्षण केंद्राचे संचालक प्रा. डॉ. एम. ए. अनुसे यांनी केले.

विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचेआॅनलाईन अर्ज भरण्यापूर्वी माहितीपुस्तिका पाहूनच विद्यार्थ्यांनी स्वत:चा युजर आयडी व पासवर्ड तयार करून रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. ज्या विषयांचे स्वयंअध्ययन साहित्य उपलब्ध आहेत, त्याची खात्री करून, तेच विषय निवडावेत. विद्यार्थ्यांच्या सोईकरिता विद्यार्थ्याने निवडलेले अभ्यासकेंद्र हेच शक्यतो परीक्षा केंद्र म्हणून दिले जाते. प्रथम वर्ष नव्याने आॅनलाईन अर्ज सादर करताना आॅनलाईन अथवा आॅफलाईन शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे बँकेची कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर