शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

सहा महिन्यांसाठी ट्रेलर पासिंग सुरू

By admin | Updated: June 16, 2017 22:46 IST

२८ टक्के जीएसटी रद्द करावा

सतीश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क  शिरोली : ट्रेलर पासिंगला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे ट्रेलर पासिंग पूर्ववत झाले आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच निघणार आहे. ट्रेलर पासिंगला दिलेली एक वर्षाची मुदत ३१ डिसेंबर २०१६ला संपली होती. २०१७ मध्ये एक जानेवारीपासूनच ट्रेलरचे पासिंग बंद झाले होते. ट्रॅक्टर ट्रेलरच्या अपघातात वाढ झाल्याने केंद्र शासनाने सन २००९ मध्ये ट्रेलरला ब्रेक लावणे सक्तीचे केले, अन्यथा ट्रेलर पासिंग बंद, असा लेखी आदेश वाहतूक आणि प्रादेशिक परिवहन आयुक्तांनी काढला होता.ट्रॅक्टर ट्रेलरच्या अपघातातील प्रमाण कमी व्हावे यासाठीच हा आदेश शासनाने काढला. ट्रेलर उद्योजकांनी ट्रेलरला हायड्रोलिक ब्रेक यंत्रणा बसवावी असे कारण पुढे आणले व राज्यातील पासिंग बंद झाले; पण अ‍ॅग्रिकल्चरल इम्प्लिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा परिवहनमंत्री, कृषिमंत्री यांची भेट घेऊन ट्रेलर पासिंग तात्पुरते सुरू करून आणले. आताही ‘आयमा’चे अध्यक्ष प्रकाश बागुल, सचिव नरेंद्र पाटील, ट्रेलर उद्योजक दत्तात्रय हजारे, युवराज चौगुले यांनी दिल्लीला जाऊन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन ट्रेलर विक्रीचा हंगाम सुरू होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले ट्रेलर पासिंग सुरू करावे, अशी मागणी केली. यावर गडकरी यांनी सहा महिन्यांत ट्रॅक्टर कंपन्यांना ब्रेक सप्लाय पॉर्इंट काढण्याचा आदेश देतो, तोपर्यंत सहा महिन्यांकरिता ट्रेलर पासिंग पूर्ववत सुरू करू, असे आश्वासन दिले. यावेळी ट्रेलर उद्योजकांनी आम्ही ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बसवायला तयार आहोत; पण ट्रॅक्टर कंपन्या ब्रेक पॉर्इंट काढायला तयार नाहीत. यावर गडकरी यांनी सहा महिन्यांत ट्रॅक्टर कंपन्यांनी ब्रेक पॉर्इंट काढल्यावर ट्रेलर उद्योजकांनीही ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बसवावी, असे शिष्टमंडळाला सांगितले. २८ टक्के जीएसटी रद्द करावाचारचाकी ट्रेलरचा समावेश अवजड वाहनात केला असून, एक जुलैपासून ट्रेलर खरेदीवर २८ टक्के जीएसटी लागणार आहे. ट्रेलर हे शेती, शेतकरी वर्गाशी निगडित वाहन आहे. २८ टक्के जीएसटीचा भार शेतकऱ्यांसाठी पडणार आहे. तरी ट्रेलरचा समावेश शेती औजारे विभागात करून २८ टक्के जीएसटी कमी करून शेती औजाराप्रमाणे जीएसटी आकारणी करावी, याबाबतचे निवेदन मंत्री नितीन गडकरी यांना ‘आयमा’च्या शिष्टमंडळाने दिल्लीत दिले.गेल्या सहा महिन्यांपासून ट्रेलर पासिंग बंद होते. अ‍ॅग्रिकल्चरल इम्प्लिमेंट असोसिएशनने (आयमा) दिल्लीला जाऊन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुन्हा ट्रेलर पासिंग सुरू करून आणले आहे; पण हे पासिंग सहा महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. - युवराज चौगुले, उद्योजकट्रेलर पासिंगला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने राज्यातील पाच हजार ट्रेलर उद्योगांना नवसंजीवनी मिळाली आहे. ट्रेलर विक्रीचा हंगाम सुरू होणार आहे. ट्रेलर पासिंग सुरू झाल्याने शेतकऱ्यांना वेळेत ट्रेलर मिळतील. - दत्तात्रय हजारे, उद्योजक