शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसात कोल्हापुरात बांधकाम कामगारांचा मोर्चाने आक्रोश, तीन हजारांहून अधिक कामगार रस्त्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:22 IST

ट्रॅक्टरवर राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतीकात्मक मोठा पुतळा आणला होता

कोल्हापूर : बांधकाम कामगारांच्या दोन मुलींना विवाह योजनेचा लाभ द्यावा. व्यसनमुक्त अभियान राबवा. सुरक्षा संच, अत्यावश्यक संच योजनेची चौकशी करा. आरोग्य तपासणी योजना बंद करा. अपडेट पर्याय सुरू करा, मध्यान्ह भोजन आणि योजनेची चौकशी करा या प्रमुख मागण्यासाठी राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या जिल्ह्यातील कामगारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. त्यामध्ये कामगार पिवळ्या रंगाच्या टोप्या घालून मोठ्या संख्येने सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर कामगारांनी शंखध्वनी करून राज्य शासनाचा निषेध केला.दसरा चौकातून मोर्चाची सुरुवात झाली. काही पाऊले मोर्चा पुढे गेल्यानंतर पावसाची सुरुवात झाली. मात्र कामगार भरपावसात घोषणा देत होते. व्हिनस कॉर्नर येथेही काही कामगार सहभागी झाले. यावेळी कामगारांच्या हातात मागण्यांची शेकडो फलक होते. पिवळ्या रंगाच्या टोप्या पुरुष आणि महिला कामगारांनी परिधान केल्या होत्या.राज्यातील तालुका सुविधा बंद करा, मध्यान्ह भोजन यंत्रणेची चौकशी करा, बांधकाम कामगारांच्या दोन मुलींना विवाह योजनेचा लाभ द्या, यासह आदींसह मागण्यांचे फलक कामगारांच्या हाती होते. कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात उपाध्यक्ष संजय गुदगे, अरविंद सुतार, पांडुरंग कांबळे, नारायण पाटील, रफीक जमादार, संजय धुमाळ, एकनाथ गुरव, संदीप व्हराळे, युवराज पाटील, गणेश कांबळे, यल्लाप्पा मादार, विजय भोसले आदी सहभागी झाले.

वाहतूक कोलमडलीमोर्चात शेकडो कामगार सहभागी झाले. त्यामुळे दसरा चौक, व्हिनस कार्नर, जिल्हाधिकारी कार्यालय, कसबा बावडा रोडवर जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक पोलिसांनी सुमारे दोन तास वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नात होते.

..काय आहेत मागण्या

  • बांधकाम कामगारांच्या मंडळावर कामगार, मालक प्रतिनिधीची तत्काळ नियुक्ती करा.
  • एफ ०२ ही योजना सरसकट नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करा.
  • कामगारांच्या पाल्यास टॅबलेट, लॅपटॉप द्या.
  • कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकांना आदेश द्या.
  • कामगारांच्या उपचारासाठी नोंदणी ॲक्टीव्हची अट रद्द करा.
  • गृहोपयोगी वस्तू लाभ योजनेसाठी नूतनीकरणाची अट रद्द करा.
  • शहरी घरकुल योजनेसाठी जाचक अटी रद्द करा

सरकाराचा प्रतीकात्मक पुतळाकामगारांनी मोर्चात ट्रॅक्टरवर राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतीकात्मक मोठा पुतळा आणला होता. हा पुतळा ट्रॅक्टरवर झोपवून घोषणा देत निषेध केला.