शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'मध्यान्ह भोजन योजने'मुळे 'कामगारांना' बळ, रोज ५२ हजार जणांना कामाच्या ठिकाणी मिळतयं मोफत जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 11:42 IST

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना कोल्हापुरात गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झाली.

संतोष मिठारी

कोल्हापूर : कोरोनाच्या कालावधीत बांधकाम कामगारांची जेवणासाठी होणारी हेळसांड थांबविण्यासाठी कामगार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना कोल्हापुरात गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झाली.याअंतर्गत रोज दुपारी आणि रात्री असे दोन्ही वेळ जिल्ह्यातील ५२ हजार ३८८ नोंदीत आणि अनोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जेवण मोफत पुरविण्यात येत आहे. वेळेत, सकस जेवण मिळत असल्याने कामगारांचे आरोग्य सुदृढ राहण्यास त्यांना काम करण्यातील ऊर्जावाढीला बळ मिळत आहे.

शासनाच्या कामगार मंत्रालयातर्फे मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत आहे. कोरोना काळात सर्व बांधकाम कामगारांना एका वेळच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार पुरविला जातो.जिल्ह्यात दि. २ जुलै २०२१ रोजी मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात झाली. याअंतर्गत कबनूर येथील सेंट्रल किचनमध्ये रोज जेवण तयार करून ते दुपारी बारा ते एक आणि रात्री सात ते आठ यावेळेत बांधकाम कामगारांना देण्यात येते.त्यात दुपारी २३७४४, तर रात्री २८६४४ कामगारांचा समावेश आहे. त्यामध्ये परप्रांतीय कामगारांचे प्रमाण अधिक आहे. भोजन योजनेमुळे बांधकाम कामगारांचे सध्या कोरोनाच्या काळात होणारे स्थलांतर कमी झाल्याने ही योजना उपयुक्त ठरली आहे.

असे आहे जेवण

तीन चपात्या, भाजी, भात, आमटी, लोणचे, सलाड, गुळाचा खडा असे जेवण हॉट कंटेनरमधून कामगारांना दिले जाते. दरम्यान, योजनेवर कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष लक्ष आहे. ते स्वत: कधीही अचानकपणे जेवणाचा दर्जा तपासतात, असे सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

नोंदीत बांधकाम कामगार : १ लाख ३८ हजार

रोज जेवण पुरविण्यात येणाऱ्या कामगारांची संख्या : ५२ हजार ३८८

बांधकाम क्षेत्रातील एकूण आस्थापनांची संख्या : ६३४

जिल्ह्यातील नोंदीत, अनोंदीत अशा एकूण ५२३८८ बांधकाम कामगारांना रोज दुपारी, रात्री मोफत जेवण दिले जाते. त्याचे संयोजन कामगार आयुक्त कार्यालयातर्फे केले जाते. या योजनेमुळे कामगारांचे स्थलांतर कमी झाले असून, योजना उपयुक्त ठरली आहे. -अनिल गुरव, सहायक कामगार आयुक्त, कोल्हापूर

 

बांधकाम कामगारांसाठीची मध्यान्ह भोजन योजना चांगली आहे. ती उपयुक्त ठरली आहे. जेवण वेळेवर मिळते. मात्र, त्याचे वितरण करण्याची व्यवस्था आणखी सक्षम होणे आवश्यक आहे. -शिवाजी मगदूम, जिल्हा सचिव, लालबावटा संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ