शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयी-सुविधांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:49 IST

cinema Amit Deshmukh Kolhapur- गेल्या काही दिवसांपासून गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीपाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथेसुध्दा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठया प्रमाणावर सुरू आहे. यामुळे येणाऱ्या काळात या चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयी-सुविधांची निर्मिती अमित देशमुख यांची महिती, मंत्रालयात घेतली बैठक

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीपाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथेसुध्दा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठया प्रमाणावर सुरू आहे. यामुळे येणाऱ्या काळात या चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात घेण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.देशमुख म्हणाले, कोल्हापूरची चित्रनगरी कात टाकत असून, येथे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात केलेल्या कामांमुळे आज येथे मोठया प्रमाणावर चित्रीकरण सुरू आहे. कोल्हापूरची चित्रनगरी विकसित झाली, तर मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपट आणि मालिकांची संख्या वाढू शकते आणि त्याचा फायदा कलाकारांसह तंत्रज्ञ कलाकारांनाही होणार आहे. येणाऱ्या काळात चित्रीकरणासाठी आवश्यक असणारे सेटर्स कायमस्वरुपी उभारणे, कलाकार आणि तंत्रज्ञानांसाठी वसतिगृहे उभारणे यावर भर देण्यात यावा.समाजसुधारकांवर चित्रपट निर्मितीआजच्या‍ पिढीला थोर समाजसुधारकांचे महत्त्व आणि त्यांनी केलेले कार्य समजण्यासाठी थोर समाजसुधारकांवर सिनेमे बनविण्यात येणार आहेत. छत्रपती शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर अशा महनीय व्यक्तींवरील सिनेमा बनविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल, असे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :cinemaसिनेमाAmit Deshmukhअमित देशमुखkolhapurकोल्हापूर