शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांचे मुश्रीफांविरोधातच कटकारस्थान, आमदार विनय कोरेंकडून नेत्यांचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 11:26 IST

मतदानाची तालुकानिहाय आकडेवारी मांडत त्यांनी नेत्यांचा पंचनामाच केल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते.

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निकालानंतर अस्वस्थ असणाऱ्या आमदार विनय कोरे यांनी गुरुवारी सत्तारूढ आघाडीच्या बैठकीत खदखद व्यक्त केली. मतदानाची तालुकानिहाय आकडेवारी मांडत त्यांनी नेत्यांचा पंचनामाच केल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीचे तीन उमेदवार पराभूत झाले. त्यातही बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचा विजयी व आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव विनय काेरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच निकालानंतर योग्य वेळी पापाची परतफेड करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. या नाराजीचे पडसाद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवर दिसत होते. गुरुवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीपूर्वी शासकीय विश्रामगृहात झालेल्या सत्तारूढ गटाच्या बैठकीत कोरे यांनी नेत्यांचा चांगलाच पंचनामा केला.मंत्री हसन मुश्रीफ हे सकाळी साडेदहा वाजताच विश्रामगृहात दाखल झाले होते. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, ए. वाय. पाटील यांच्यासह संचालक दाखल झाले. विनय काेरे व विजयसिंह माने हे दुपारी १२ वाजता तिथे आले. त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. तब्बल सव्वा तास चर्चेत कोरे यांनी तालुकानिहाय आकडेवारी मांडत धारेवर धरले.शेतकऱ्यांची बँक असल्याने राजकारण विरहित असावी, म्हणून बिनविरोधसाठी प्रयत्न केले. ठीक आहे, निवडणूक लागली जर तुम्हाला आमचे उमेदवार मान्य नव्हते तर त्यावेळी सांगायला हवे होते. नंतर फसवाफसवी कशाला करता, तुमच्यासारख्या उंचीवर काम करणाऱ्यांकडून हे अपेक्षित नव्हते. अशा स्पष्ट शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि बैठकीतून बाहेर गेले.

नेत्यांचे मुश्रीफांविरोधातच कटकारस्थान

- सत्तारुढ आघाडीतील नेत्यांचे हसन मुश्रीफ यांच्याविरोधातच कटकारस्थान सुरू होते, असा गंभीर आरोप कोरे यांनी केल्याचे समजते.- तुमच्या सारख्यामुळे नेत्यांच्या विश्वासार्हतेला तडा जातो, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

नुसते ‘प्रक्रिया’ गटातच मते फुटली का?

- विनय कोरे यांनी ‘पतसंस्था’ व ‘प्रक्रिया’ गटातील मतांवर बोट ठेवल्यानंतर, नुसते या दोन गटातच मते फुटली का?- इतर गटातील फुटलेल्या मतांचाही पंचनामा का होत नाही? झालेले झाले, येथून पुढे एकसंधपणे पुढे जाण्याचे धाेरण घेऊया, असे एका नेत्याने सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफVinay Koreविनय कोरेPoliticsराजकारण