शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : खुर्च्या मोजण्यापेक्षा स्वत:च्या चार जागांवर लक्ष द्यावे : गिरीष महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 19:23 IST

खुर्च्या मोजण्याचे काम त्यांचे नाही, ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमच्या खुर्च्या मोजण्यापेक्षा स्वत:च्या चार जागा निवडून आणण्यावर लक्ष द्यावे, अशा शब्दात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना प्रत्त्युत्तर दिले.

ठळक मुद्देखुर्च्या मोजण्यापेक्षा स्वत:च्या चार जागांवर लक्ष द्यावे : गिरीष महाजन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सर्व काही तिढे

कोल्हापूर : खुर्च्या मोजण्याचे काम त्यांचे नाही, ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमच्या खुर्च्या मोजण्यापेक्षा स्वत:च्या चार जागा निवडून आणण्यावर लक्ष द्यावे, अशा शब्दात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना प्रत्त्युत्तर दिले.युतीच्या प्रचार प्रारंभाच्या सभेनिमित्त मंत्री महाजन कोल्हापुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री महाजन म्हणाले, भाजप-शिवसेना युतीमध्ये कोणतेही तिढे नाहीत. सर्व काही तिढे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षच राजीनामा देण्याच्या तयारी आहेत. आमचे सर्व नियोजन पक्के आहे. त्यामुळे गेल्या वर्षी पेक्षा भाजप-शिवसेना युतीच्या निश्चितपणे जादा जागा निवडून येतील. माढा मतदार संघातील आमचा उमेदवार येत्या दोन दिवसांत निश्चित होईल. याठिकाणी आमचाच उमेदवार निवडून येईल.

निवडणुकीनंतर अनेकजण येणारकाँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मोठ्या नेत्यांना भविष्याचे वेध लागले आहेत. त्यांना माहित आहे की, देशात भाजप-सेनेचे सरकार पुन्हा येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत. त्यामुळे हे नेते आम्हाला आता मदत करत असून निवडणुकीनंतर ते भाजपमध्ये येणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGirish Mahajanगिरीश महाजनkolhapurकोल्हापूर