शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
5
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
6
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
7
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
8
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
9
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
10
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
11
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
12
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
13
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
14
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
15
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
16
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
17
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
18
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
19
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
20
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता

सभापती निवडीत काँग्रेसचा वरचष्मा

By admin | Updated: September 15, 2014 00:24 IST

हातकणंगले, पन्हाळा निवडी चिठ्ठीवर : शाहूवाडीत संख्याबळ असूनही सत्यजीत पाटील गटाकडे सत्ता नाही

कोल्हापूर : पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीत काँग्रेसने बारापैकी सहा पंचायत समित्या आपल्या ताब्यात ठेवत वरचष्मा कायम राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, तर ‘स्वाभिमानी’ने शिरोळची सत्ता कायम ठेवली, तर ‘जनसुराज्य’ला पन्हाळ्याची सत्ता अडीच वर्षांनंतर चिठ्ठीवर मिळाली. हातकणंगले येथे समसमान बलाबलमुळे चिठ्ठीवर कॉँग्रेसने बाजी मारली. चंदगडमध्ये माजी आमदार नरसिंगराव पाटील गटाच्या ज्योती पाटील यांची सभापती, तर माजी मंत्री भरमूअण्णा पाटील गटाचे शांताराम पाटील यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. राधानगरी व भुदरगडमध्ये दोन्ही काँग्रेसची समझोता एक्स्प्रेस कायम राहिली. राधानगरीमध्ये ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर यांच्या पत्नी व आमदार के. पी. पाटील यांच्या कन्या रूपाली पाटील यांची सभापती, तर कॉँग्रेसच्या सुप्रिया साळोखे यांची उपसभापतिपदी निवड झाली. भुदरगडमध्ये राष्ट्रवादीचे विलास कांबळे सभापती, तर कॉँग्रेसच्या रतिपौर्णिमा कामत उपसभापती झाल्या. कागलमध्ये संजय घाटगे गटाचे श्रीकांत लोहार सभापती, तर सदाशिवराव मंडलिक गटाचे भूषण पाटील यांची उपसभापती म्हणून फेरनिवड करण्यात आली. गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीच्या अनुसया सुतार यांची सभापती, तर तानाजी कांबळे यांची उपसभापतिपदी निवड झाली. शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शीला दिलीपकुमार पाटील यांची सभापती, तर अनिता अमरसिंह माने यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. गगनबावडामध्ये कॉँग्रेसचे तानाजी पाटणकर यांची सभापती, तर मावळते सभापती शालिनी शेळके यांची उपसभापतिपदी निवड झाली. करवीरमध्ये काँग्रेसच्या पूनम जाधव यांची सभापतिपदी, तर दत्तात्रय मुळीक यांची उपसभापतिपदी फेरनिवड करण्यात आली. हातकणंगलेचे सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने येथे जोरदार रस्सीखेच झाली. येथे ११-११ बलाबल झाल्याने सभापती, उपसभापती निवडी चिठ्ठीवर घेण्यात आल्या. कॉँग्रेसचे राजेश पाटील व राष्ट्रवादीचे (माने गट) प्रमोदिनी पाटील यांची उपसभापतिपदी निवड झाली. पन्हाळ्यामध्येही समान बलाबलमुळे चिठ्ठीवर ‘जनसुराज्य’ने अडीच वर्षांनंतर सत्ता हस्तगत केली. शाहूवाडीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते. येथे सत्तारूढ सत्यजित पाटील गटाकडे या प्रवर्गातील सदस्य नसल्याने कॉँग्रेसचे पंडित नलवडे यांनी बाजी मारली. उपसभापतिपदी पाटील गटाचे नामदेव पाटील यांची बिनविरोध निवड झाली.(प्रतिनिधी)शाहूवाडीअनूसूचित जातीपंडित नलवडे कॉँग्रेसनामदेव पाटीलसरूडकर गटकाँग्रेस-२, सरूडकर-५, जनसुराज्य-१आजराओबीसी पुरुषविष्णुपंत केसरकर राष्ट्रवादीदीपक देसाईकाँग्रेस राष्ट्रवादी-४, काँग्रेस-२गगनबावडासर्वसाधारणतानाजी पाटणकरकॉँग्रेसशालिनी शेळकेकॉँग्रेसकाँग्रेस-३, राष्ट्रवादी-१पन्हाळासर्वसाधारण महिलासुनीता पाटीलजनसुराज्यरवींद्र जाधवजनसुराज्यजनसुराज्य-६, काँग्रेस-२,नरके गट-३, राष्ट्रवादी-१करवीरसर्वसाधारण महिलापूनम जाधवकाँग्रेसदत्तात्रय मुळीककाँग्रेसकाँग्रेस-१३, शिवसेना-३, शेकाप-२,जनसुराज्य, स्वाभिमानी, अपक्ष-१शिरोळओबीसी महिलाशीला पाटीलस्वाभिमानीअनिता माने स्वाभिमानीस्वाभिमानी शेतकरी संघटना-८,काँग्रेस-राष्ट्रवादी-६, अपक्ष-२हातकणंगलेसर्वसाधारणराजेश पाटीलकाँग्रेसप्रमोदिनी पाटीलराष्ट्रवादीकाँग्रेस-८, शिवसेना-भाजप-४,जनसुराज्य-४, राष्ट्रवादी-५, अपक्ष-१ गडहिंग्लजसर्वसाधारणअनुसया सुतारराष्ट्रवादी तानाजी कांबळराष्ट्रवादीराष्ट्रवादी-८, जनसुराज्य-१,जनता दल-१राधानगरीसर्वसाधारणरूपाली पाटीलराष्ट्रवादीसुप्रिया साळोखेकाँग्रेसराष्ट्रवादी-४, जनता दल-१,स्वाभिमानी-१, काँग्रेस-४भुदरगडअनुसूचित जातीविलास कांबळेराष्ट्रवादीरतिपौर्णिमा कामतकाँग्रेसकॉँग्रेस-४, राष्ट्रवादी-४कागलओबीसी पुरुषश्रीकांत लोहारकाँग्रेसभूषण पाटीलकाँग्रेसकाँग्रेस-७, राष्ट्रवादी-२, घाटगे गट-१ चंदगडसर्वसाधारण महिलाज्योती पाटीलकाँग्रेसशांताराम पाटीलकाँग्रेसकाँग्रेस-६, राष्ट्रवादी-४