शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पांडवरुपी जनताच महाडिकांंना उत्तर देईल; सतेज पाटील यांचा पलटवार

By राजाराम लोंढे | Updated: August 26, 2022 20:01 IST

दहीहंडीच्या कार्यक्रमात खासदार महाडीक यांनी ‘खूप सहन केले, आता जिल्ह्यात महाभारत सुरु होईल’, असा इशारा आमदार सतेज पाटील यांना दिला होता.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : काहीजण महाभारत घडवणार आहेत, पण आम्ही रामायण घडवणारी मंडळी आहोत. जर महाभारत घडले तर पांडवरुपी जनताच त्यांना उत्तर देईल, असा पलटवार आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडीक यांच्यावर शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.

दहीहंडीच्या कार्यक्रमात खासदार महाडीक यांनी ‘खूप सहन केले, आता जिल्ह्यात महाभारत सुरु होईल’, असा इशारा आमदार सतेज पाटील यांना दिला होता. याबाबत विचारले असता, आमदार पाटील म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षे आपण व ज्येष्ठ नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या विकासाला गती दिली. खरे तर, लोकसभा, विधानसभा निवडणूकीला अजून वेळ आहे. त्यावेळी टीकाटिपणी करुया. सत्ता आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी काय करणार, हे सांगणे अपेक्षित आहे. आमच्या काळात कोल्हापूर विमानतळासाठी निधी मंजूर केला, मात्र आता तो आला.

कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे, मात्र सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून ग्रामीण जनतेशी बोलले पाहिजे. त्यांना विकासाचा विश्वास दिला पाहिजे. बांधकाम परवान्यासह सुविधांबाबत समर्पक उत्तर दिले पाहिजे. यासाठी आपण ग्रामीण जनतेशी बोलूया, असे कृती समितीला यापुर्वीच सांगितल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.ज्येष्ठांनी राहुल गांधींच्या मागे रहावेगुलामनबी आझाद हे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या सारख्या तरुणांना कॉग्रेसमधील ज्येष्ठांकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्या मागे राहिले पाहिजे. ४०,५० वर्षे सत्तेच्या माध्यमातून पदे घेतली, आता सगळ्यांनी मिळून पक्ष बळकटीसाठी पुढे आले पाहिजे. असे आमदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकcongressकाँग्रेसBJPभाजपा