शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

काँग्रेसने एमआयएमचा पाठिंबा नाकारला, कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून स्वागत  

By पोपट केशव पवार | Updated: April 24, 2024 17:45 IST

कोल्हापर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना एमआयएमने पाठिंबा दिला होता. याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला.

कोल्हापूर : कोल्हापूर ही सर्वधर्मभाव जपणारी भूमी असून देशद्रोही, जातीयवादी असलेल्या एमआयएम पक्षाचा पाठिंबा न स्वीकारण्याची काँग्रेसने घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचे कोल्हापुरातील सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. कोल्हापर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना एमआयएमने पाठिंबा दिला होता. याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला. काँग्रेसनेही आम्ही पाठिंबा मागितलाच नव्हता तर तो स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठे असे पत्रक काढून जाहीर केले. या पार्श्वभूमीवर हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई व सुनील सामंत यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे स्वागत केले. ते म्हणाले, एमआयएम हा देशविरोधी व प्रखर जातीयवादी पक्ष आहे. शाहू छत्रपती यांना पाठिंबा देऊन हा पक्ष सर्वधर्मभाव जपणाऱ्या कोल्हापुरात जातीयवादाची बीजे पेरु पाहत होता. मात्र, आम्ही त्याला वेळीच कडाडून विरोध केला. या पक्षाने देशात, छत्रपती संभाजीनगर येथे दंगली घडवून आणत वातावरण दूषित केले. त्यामुळे असा पक्ष कोल्हापुरात येण्यास आमचा नेहमीच विरोध राहील. त्यांचा डाव आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही. काँग्रेसने वेळीच त्यांचा पाठिंबा नाकारला याचे आम्ही स्वागत करतो. यावेळी उदय भोसले, संदीप सासणे, निरंजन शिंदे,योगेश केळकर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन