शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर टायर सारखी : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:16 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांमध्ये आता कोणी शिल्लक राहिले नाही. जागा वाटपवारुन त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे. गिरीश महाजन दिसले की, विरोधकांना धडकी भरते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर असलेल्या टायर सारखी झाली आहे. आम्ही मांडलेले प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले आहेत, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे केले.

ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर टायर सारखी : उद्धव ठाकरे विरोधकांमध्ये आता कोणी शिल्लक नाही

कोल्हापूर :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांमध्ये आता कोणी शिल्लक राहिले नाही. जागा वाटपवारुन त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे. गिरीश महाजन दिसले की, विरोधकांना धडकी भरते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर असलेल्या टायर सारखी झाली आहे. आम्ही मांडलेले प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले आहेत, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे केले.

 

कोल्हापूरमधील तपोवन मैदानावर भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रारंभ सभेमध्ये ते बोलत होते. गरीब जनतेच्या भल्यासाठी भाजप-शिवसेना युतीला सत्ता हवी आहे. अंबाबाईच्या नगरीत नतमस्तक होवून सांगतो की, तुमचे आशिर्वाद हेच आमचे भांडवल आहे. तुमच्या विश्वासाला तडा जावून देणार नाही इतकेच वचन मी तुम्हाला देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तर निवडणूक कशाला लढवितापाकिस्तानात खेळाडू पंतप्रधान झाला, इकडे पंतप्रधानांची स्वप्न पाहणारा क्रिकेट बोर्डावर. सरकार जर तुमच्या सल्ल्याने चालत असेल, तर निवडणूक कशाला लढविता, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.

नरेंद्र पाटील यांचा सेनेत प्रवेशमाथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यावर माथाडी नेत्याला खासदार बनविणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे