शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: ..मग शेट्टींना आम्ही कसे फसवले?, सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर 

By विश्वास पाटील | Updated: June 17, 2024 19:06 IST

विधानसभेला एकसंधपणे सामोरे जाणार

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत यावेत, यासाठी पहिल्यापासून मी प्रयत्न केला; पण त्यांना फक्त उद्धवसेनेचीच सोबत हवी होती. दोन्ही काँग्रेससोबत येण्यास नकार दिल्याने वरिष्ठ पातळीवर समज-गैरसमज झाला. आम्ही कोणाचीही फसवणूक केली नसल्याची माहिती काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.आमदार पाटील म्हणाले, राजू शेट्टी हे आघाडीसोबत यावेत, यासाठी आग्रह धरणारा मी एकमेव होतो. त्या दृष्टीने आघाडीच्या पातळीवर चर्चाही झाली होती. आघाडीकडून एखादी जागा सोडल्यानंतर त्याच्या बदल्यात राज्यात काहीतरी भूमिका जाहीर करायला हवी, यासाठी लेखी स्वरूपात चर्चा झाली होती. बुलढाण्याबाबत त्यांना तांत्रिक अडचण होती, तरीही ‘हातकणंगले’त पाठिंबा जाहीर करा, राज्य कार्यकारिणी घेऊन उर्वरित ठिकाणी आघाडीला पाठिंबा देऊ, असे शेट्टी यांनी सांगितले.तसे घडले नाही. त्यामुळे फसवणूक आघाडीने केलेली नाही. दोघांमध्ये सुसंवाद झाला नाही, अंतिम टप्प्यात शेवटच्या दोन दिवसांत आपण स्वत: त्यांच्याशी चर्चा करून सगळ्या गोष्टी सांगितल्या. नंतर ते तयार झाले होते; पण तोपर्यंत वरिष्ठ पातळीवर समज-गैरसमज झाल्याने चर्चा फिस्कटली.

विधानसभेला एकसंधपणे सामोरे जाणार‘स्वाभिमानी’ आमच्यासोबत हवी, म्हणून लोकसभेला भूमिका घेतली होती. विधानसभेला आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आघाडीत कोणाला घ्यायचे याचा निर्णय राज्यपातळीवर होईल. महाविकास आघाडी म्हणून विधानसभा एकसंधपणे लढणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीvidhan sabhaविधानसभा