शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा आवाज बंद करण्याचा काँग्रेसचे षडयंत्र :रविकिरण इंगवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 15:52 IST

Muncipal Corporation shivsena Kolhapur -फिरंगाई प्रभाग क्रमांक ४७ मधील ६५० मते दुसऱ्या प्रभागात घुसवली असून दक्षिण मतदार संघातील मते इकडे नोंद केली आहेत. शिवसेनेचा आवाज बंद करण्याचे षडयंत्र सत्तेत असणारी काँग्रेस करत आहे. महापालिका निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार पराभूत करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देशिवसेनेचा आवाज बंद करण्याचा काँग्रेसचे षडयंत्र :रविकिरण इंगवलेफिरंगाई प्रभागातील ६५० मते जाणूनबुजून दुसय्रा प्रभागात घालवल्याचा आरोप

कोल्हापूर : फिरंगाई प्रभाग क्रमांक ४७ मधील ६५० मते दुसऱ्या प्रभागात घुसवली असून दक्षिण मतदार संघातील मते इकडे नोंद केली आहेत. शिवसेनेचा आवाज बंद करण्याचे षडयंत्र सत्तेत असणारी काँग्रेस करत आहे. महापालिका निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार पराभूत करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेकडून करण्यात येणारी विकासकामे, तगड्या उमेदवारांचा पक्षातून उमेदवारी मागणीच वाढता कल, मंत्र्यांवर यापूर्वी केलेला आरोप यामुळेच काँग्रेसकडून अशा प्रकारचे राजकारण सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.इंगवले म्हणाले, महापालिकेने जाहिर केलेल्या प्रारुप मतदार यादीतील गैरकारभार समोर आला आहे. यामध्ये फिरंगाईमधील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. ६५० पेक्षा जास्त हक्काची मते तटाकडील तालीम प्रभाग क्रमांक ४८ मध्ये गेली आहेत. तसेच फिरंगाई प्रभागात मिराबाग, दुधाळी, लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा, शाहू कॉलनी, वेताळ तालीम, खंडोबा तालीम येथील मतदारांचा समावेश केला आहे.

असाच प्रकार सर्वच प्रभागात झाला आहे. ताबडतोब पूर्वीप्रमाणे मतदार यादी करावी अन्यथा महापालिकेचे कामकाज बंद पाडू. तीव्र आंदोलन करु. पत्रकार परिषदेला आबा जगदाळे, राजू घोरपडे, तात्या साळोखे, सुकूमार लाड, जीवन घोरपडे आदी उपस्थित होते.कोणत्या मंत्र्याच्या सांगण्यावरुन घोळफिरंगाई प्रभागात १२०० पेक्षा जास्त मतांचा घोळ झाला आहे. महापालिकेतील अधिकाय्रांनी कोणत्या मंत्र्याच्या सांगण्यावरुन हे षडयंत्र केले याचा खुलासा केला पाहिजे, अशी मागणीही इंगवले यांनी केली. मंत्र्यानेही संबंधित अधिकाय्रांना पूर्वीप्रमाणे यादी करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा इंगवले यांनी दिला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर