शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
5
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
6
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
7
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
8
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
9
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
10
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
11
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
12
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
13
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
14
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
15
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
16
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
17
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
18
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
19
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
20
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका

भाजपसह काँग्रेसचीही वाट बिकट

By admin | Published: March 15, 2017 12:20 AM

जिल्हा परिषदेचे सत्ताकारण : नरकेंचा राहुल पाटील यांना विरोध; सरुडकर, संजय घाटगेंची भूमिका ‘जर-तर’

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सत्तेत दोन्ही कॉँग्रेससोबत जाण्यास शिवसेना नेत्यांना ‘मातोश्री’वरून होकार आल्याने भाजपची अस्वस्थता वाढली आहे; पण कॉँग्रेसने अध्यक्षपदासाठी राहुल पी. पाटील यांचे नाव पुढे केल्याने शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी त्याला उघड विरोध केला आहे. आमदार सत्यजित पाटील-सरुडकर व संजय घाटगे यांचीही भूमिका जर-तर अशीच आहे. प्रकाश आवाडे यांचाही ‘पी. एन.’ यांच्यावर राग असल्याने सत्तेच्या ‘३४’ या मॅजिक फिगरपर्यंत पोहोचण्यासाठी कॉँग्रेसचा मार्ग खडतर होत चालला आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दृष्टीने जिल्हा परिषदेची सत्ता प्रतिष्ठेची झाल्याने त्यांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली असली तरी त्यांनाही सत्तेपर्यंत पोहोचणे तितकेसे सोपे नाही. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. पंचायत समितीचे सभापती, उपसभापती निवडीच्या माध्यमातून तिन्ही पक्ष एकत्र आल्याने जिल्हा परिषदेतील दिशा स्पष्ट झाली आहे. भाजपची संपूर्ण मदार शिवसेनेवर राहिल्याने त्यांची कोंडी झाली असली तरी त्यांनी मंगळवारी दिवसभर आक्रमक हालचाली केल्या. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री विनय कोरे यांनी मॅजिक फिगरची जोडणी लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. कॉँग्रेसने अध्यक्षपदासाठी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांचे नाव पुढे केल्याने भाजपला गोळाबेरीज करणे तसे सोपे नाही. शिवसेनेने पाठबळ दिल्याने दोन्ही कॉँग्रेसची ताकद वाढली असली तरी शिवसेनेअंतर्गत कुरघोडीने उचल खाल्ली आहे. पी. एन. पाटील व आमदार नरके हे ‘करवीर’मधील विरोधक असल्याने नरके यांनी राहुल पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ‘गोकुळ’च्या राजकारणामुळे महादेवराव महाडिक यांचा सत्यजित पाटील यांच्यावर दबाव आहे. भाजपकडून शौमिका महाडिक यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले, तर सत्यजित पाटीलही भाजपसोबत राहणार हे नक्की आहे. महाडिकांऐवजी अरुण इंगवले यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले तर त्यांचे व्याही संजय घाटगे यांची भूमिका महत्त्वाचे राहणार आहे. पाठिंब्यावरून शिवसेनेत फूट पडू शकते. दहा सदस्यांपैकी पाच दोन्ही कॉँग्रेसकडे, तर पाच भाजपकडे जाऊ शकतात. त्यामुळे सत्तेची मॅजिक फिगर गाठताना कॉँग्रेसची दमछाक उडणार आहे. सत्ता कोणाचीही आली तर एक-दोन सदस्यांचेच मताधिक्य राहणार आहे. नरकेंच्या सदस्यांचे फोन स्विच आॅफ निवडून आलेल्या सदस्यांना कायदेशीरपणे बांधण्यासाठी आघाडीची नोंदणी करावी लागते. दोन्ही कॉँग्रेस, भाजपने नोंदणी केली आहे; पण अद्याप शिवसेनेने ती केलेली नाही. येत्या दोन दिवसांत शिवसेनेच्या आघाडीची नोंदणी केली जाणार असून त्यासाठी सदस्यांना एकत्रित करण्याच्या हालचाली सुरू आहेत; पण चंद्रदीप नरके यांच्या तीन सदस्यांचे फोन स्विच आॅफ असल्याची चर्चा आहे. भाजपच्या उमेदवारावरच सत्तेचे गणितभाजपकडून कोणते नाव पुढे केले जाते यावरच सत्तेचे गणित अवलंबून आहे. शौमिका महाडिक या रिंगणात राहिल्या तर शिवसेनेचे नरके, सरुडकर पाठिंबा देणार. इंगवले रिंगणात राहिले, तर सरुडकर कॉँग्रेससोबत राहतील, अशीच अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे सध्या तरी या जर-तरच्या फेऱ्यातच जिल्हा परिषद सत्तेचा सारीपाट अडकला आहे. महाडिकांची कोंडी करण्यासाठीच ‘राहुल’‘गोकुळ’सह जिल्ह्याच्या राजकारणात पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक एकत्रित आहेत. कॉँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या गटाचे नाव पुढे आले, तर महाडिक ताकदीने उतरणार. राहुल यांचे नाव पुढे केले तर महाडिक यांच्या विरोधाची धार कमी होऊ शकते. भाजपकडून शौमिका महाडिक यांचे नाव पुढे येण्याची शक्यता असल्याने महाडिक-पाटील यांच्यात लढत लावण्याची खेळीही कॉँग्रेस, राष्ट्रवादी अंतर्गत खेळल्याची चर्चा सुरू आहे. शौमिका महाडिक भाजप१४जनसुराज्य६ताराराणी३युवक क्रांती२स्वाभिमानी१आवाडे गट२नरके गट३सरुडकर गट२एकूण३३राहुल पाटीलकॉँग्रेस१४राष्ट्रवादी११आबिटकर३मंडलिक-घाटगे२मिणचेकर गट१उल्हास पाटील गट१स्वाभिमानी१अपक्ष१एकूण३४