शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

सांगली जिल्ह्यात नातलगांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 23:31 IST

कुटुंबीय व नातलगांच्या आडून घरातच सत्ता ठेवण्याचा या नेतेमंडळींचा प्रयत्न आहे.

श्रीनिवास नागे --- सांगली --जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत घराणेशाहीचा झेंडा फडकविताना जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदारांच्या कुटुंबीय व जवळच्या नातलगांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कुटुंबीय व नातलगांच्या आडून घरातच सत्ता ठेवण्याचा या नेतेमंडळींचा प्रयत्न आहे.  कृषी, पणन, पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी बागणी (ता. वाळवा) जिल्हा परिषद गटातून रयत विकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे पुत्र सत्यजित नाईक शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक पंचायत समिती गणातून भाजपतर्फे, तर याच तालुक्यातील कोकरूड जिल्हा परिषद गटातून विधानपरिषदेचे माजी सभापती आ. शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख कॉँग्रेसतर्फे मैदानात उतरले आहेत. शिराळ्यातील मांगले जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भावजय अश्विनी राष्ट्रवादीकडून लढत असून त्यांचा सामना भाजपकडून लढणाऱ्या चुलत जाऊबाई अनन्या नाईक यांच्याशी होत आहे.जत येथील भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचे पुत्र मनोज जगताप यांनी तालुक्यातील तिकोंडी पंचायत समिती गणातून, खानापूर-आटपाडी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांनी नागेवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेतर्फे रिंगणात उतरले आहेत, तर माजी आमदार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांचे पुत्र विशाल यांनी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. विधान परिषदेचे आमदार मोहनराव कदम यांच्या स्नुषा वैशाली शांताराम कदम देवराष्ट्रे (ता. कडेगाव) गटातून काँग्रेसतर्फे नशीब अजमावत असून, आ. पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड कुंडल (ता. पलूस) जिल्हा परिषद गटातून काँग्रेसतर्फे राष्ट्रवादीशी सामना करत आहेत. माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे वाळवा तालुक्यातील बागणी गटातून राष्ट्रवादीतर्फे लढत आहेत. पक्षाचे नेते माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे पुतणे देवराज पाटील यांनी कासेगाव पंचायत समिती गणातून आणि पुतणी संगीता संभाजी पाटील यांनी कासेगाव गटातून राष्ट्रवादीतर्फे अर्ज भरला आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे चुलते डी. के. पाटील यांनी चिंचणी जिल्हा परिषद गटातून भाजपच्यावतीने गड सांभाळत आहेत. आटपाडीचे माजी आमदार व नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले राजेंद्रअण्णा देशमुख यांचे पुत्र हर्षवर्धन आटपाडी गणातून लढत आहेत.