शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्यावरून शिक्षकांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 11:19 IST

Scholarship EducationSector Kolhapur- विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज जमा करा, म्हणून सातत्याने आवाहन करून देखील न फिरकलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांनी शेवटच्या दिवशी मात्र अचानक गर्दी करून संपूर्ण यंत्रणेला मंगळवारी वेठीस धरले. शहरातील स. म. लोहिया विद्यालयातील केंद्रावर गोंधळ घातला. अखेर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी प्रस्ताव स्वीकारत आहे, पण पुढे असे चालणार नाही, अशी समज दिल्यानंतर गोंधळ थांबला.

ठळक मुद्देशिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्यावरून शिक्षकांचा गोंधळ अचानक गर्दी करून संपूर्ण यंत्रणेला धरले वेठीस

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज जमा करा, म्हणून सातत्याने आवाहन करून देखील न फिरकलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांनी शेवटच्या दिवशी मात्र अचानक गर्दी करून संपूर्ण यंत्रणेला मंगळवारी वेठीस धरले. शहरातील स. म. लोहिया विद्यालयातील केंद्रावर गोंधळ घातला. अखेर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी प्रस्ताव स्वीकारत आहे, पण पुढे असे चालणार नाही, अशी समज दिल्यानंतर गोंधळ थांबला.इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती प्रस्ताव भरण्यासाठीची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू आहे. दि. १५ फेब्रुवारीपर्यंत कॅम्प घेऊन देखील शिक्षक उदासीन असल्याने अखेर समाजकल्याणकडून कारवाईचा इशाराही देण्यात आला होता, शिवाय गेल्या पाच दिवसांपासून विशेष कॅम्पही आयोजित केले होते. मंगळवारी त्याचा शेवटचा दिवस होता.

यासाठी करवीर तालुक्यातील ४०० शिक्षकांना बोलावण्यात आले होते. पण अखेरचा दिवस असल्याने अर्ज स्वीकारणे बंद होईल, म्हणून राधानगरी, शिरोळमधील २०० शिक्षकही येथे आले. याशिवाय प्रस्तावात त्रुटी घेऊनही काही शिक्षक आले. एकाचवेळी ६०० ते ७०० शिक्षक जमल्याने तेथील नियोजन कोलमडले.

यावरून उपस्थित शिक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी तेथे धाव घेत, सर्व अर्ज स्वीकारत असल्याचे सांगितले. त्यासह येथून पुढे असा उशीर आणि गोंधळ घालून यंत्रणेला वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दात समज दिली.समाजकल्याण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती कॅम्पमध्ये शिक्षकांनी गोंधळ घातला.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र