शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक संघाच्या सभेत गोंधळ : हमरी-तुमरी, ढकलाढकलीचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:16 IST

kolhapur, Education Sector, Teacher विरोध झुगारून जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वार्षिक सभेत मंगळवारी नवीन कार्यकारिणी मंजूरी झाली. या कार्यकारिणी निवडीसाठी मतदान घेण्याच्या पध्दतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.

ठळक मुद्देमुख्याध्यापक संघाच्या सभेत गोंधळ : हमरी-तुमरी, ढकलाढकलीचा प्रकारविरोध झुगारून नवी कार्यकारिणी मंजूर

 कोल्हापूर : विरोध झुगारून जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वार्षिक सभेत मंगळवारी नवीन कार्यकारिणी मंजूरी झाली. या कार्यकारिणी निवडीसाठी मतदान घेण्याच्या पध्दतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. सत्ताधारी- विरोधक समर्थकांमध्ये हमरी-तुमरी, ढकलाढकली, एकमेकांच्या विरोधातील घोषणा अशा गोंधळाच्या वातावरणात अवघ्या अर्ध्या तासात सभा पार पडली.येथील विद्याभवनमधील सभागृहात सकाळी अकरा वाजता मुख्याध्यापक संघाची ७६ वी वार्षिक सभा सुरू झाली. अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी वर्षभरातील कामाचा आढावा सादर केला. सचिव दत्ता पाटील यांनी विषयांचे वाचन केले. त्यांनी जमाखर्च पत्रकाच्या मंजुरीचा विषय मांडला.

दत्ता पाटील यांनी नवीन कार्यकारिणी निवडीचा विषय मांडताच त्यासाठी रितसर प्रक्रिया राबविली नसल्याचे सांगत विरोधकांतील व्ही. जे. पोवार, आर. वाय पाटील, आदींनी या विषयाला विरोध केला. पण, हात उंचावून मतदान घेण्यावर सत्ताधारी ठाम राहिले.

त्यातून वादावादी आणि खडाजंगी झाली. त्यात विरोधकांतील काहींनी व्यासपीठावर जावून माईक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना समर्थकांनी रोखले. व्यासपीठाखाली दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये हमरी-तुमरी, ढकलाढकली सुरू झाली. विरोधकांनी हुकुमशाही, दडपशाहीचा धिक्कार असो अशा, तर सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा विजय असो अशा घोषणा सुरू केल्या. त्यातच सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी हात उंचावून मत नोंदवित नवीन कार्यकारिणी निवडीचा विषय मंजूर केला. या गोंधळात सभा संपली.

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र