शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

प्रोसिडिंगवरून गोकुळच्या सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 17:03 IST

GokulMilk Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेत मागील सभेच्या प्रोसिडिंग वाचण्यावरून जोरदार गोंधळ उडाला. सभाच झाली नाहीतर प्रोसिडिंग मंजूर कसे करता, असा सवाल करता विरोधकांनी शेवटपर्यंत हा मुद्दा लावून धरल्याने गोंधळात भर पडली. अखेर विषयपत्रिकेवरील सर्व विषय आवाजी मताने मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देसभाच झाली नाहीतर मागील प्रोसिडिंग मंजूर कसे? मूठभर विरोधकांकडून सभा उधळण्याचा प्रयत्न- अरुण नरके

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेत मागील सभेच्या प्रोसिडिंग वाचण्यावरून जोरदार गोंधळ उडाला. सभाच झाली नाहीतर प्रोसिडिंग मंजूर कसे करता, असा सवाल करता विरोधकांनी शेवटपर्यंत हा मुद्दा लावून धरल्याने गोंधळात भर पडली. अखेर विषयपत्रिकेवरील सर्व विषय आवाजी मताने मंजूर करण्यात आले.गोकुळची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी संघाच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखाना कार्यस्थळावर झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक अरुण नरके होते. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन करताना मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, या पहिल्या विषयावरच विरोधकांनी हरकत घेतली.

मागील सभेत दूध उत्पादकांच्या सत्कारापर्यंत सभा चालली होती, त्यानंतर सभाच झाली नाहीतर विषय आले कोठून, अशी विचारणा किरणसिंह पाटील यांनी केली. सभा झाली आहे, त्याप्रमाणे शासनाने प्रोसिडिंग मंजूर केल्याचे सभाध्यक्ष अरुण नरके यांनी सांगितले. सभा कशी झाली, हे सगळ्या जिल्ह्याने व महाराष्ट्राने पाहिल्याचे सदाशिव चरापले यांनी सांगितले.

यावर विषय मंजूर करत दुसऱ्या विषयाचे वाचन सुरू केले. मात्र, विरोधकांनी काहीसा गोंधळ करण्यास सुरुवात केली. त्यातच विषयपत्रिकेवरील विषय मंजूर करण्यात आले. संचालक रणजीतसिंह पाटील यांनी आभार मानले.घाणेकरांविरोधात घोषणाबाजीकार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या विरोधात घाणेकर हटाव अशा घोषणा देण्यात आल्या. सेवानिवृत्त होऊनही त्यांना मुदतवाढ का, अशी विचारणाही करण्यात आली. 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर