शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोट प्रकरणः प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
3
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
5
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
6
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
7
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
8
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
9
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
10
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
11
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
12
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
13
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
14
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
15
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
16
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
17
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
18
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
19
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
20
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!

जप्त दारू तपासणीपूर्वीच केली फस्त, कुंपणानेच खाल्ले शेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 16:45 IST

liquor ban Excise Department kolhapur - चार जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाणे व उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत जप्त केलेली दारू ही दारुबंदी विभागाच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवली, पण ती तपासणी होण्यापूर्वीच तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पिऊन फस्त केली. कुंपणानेच शेत खाल्ल्याचा अजब प्रकार कोल्हापुरातील ताराराणी चौकातील दारुबंदी विभागाच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत उघडकीस आला.

ठळक मुद्देकोल्हापुरात दारुबंदीच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत धक्कादायक प्रकार सहा कर्मचारी अटक, एक फरार

कोल्हापूर : चार जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाणे व उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत जप्त केलेली दारू ही दारुबंदी विभागाच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवली, पण ती तपासणी होण्यापूर्वीच तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पिऊन फस्त केली. कुंपणानेच शेत खाल्ल्याचा अजब प्रकार कोल्हापुरातील ताराराणी चौकातील दारुबंदी विभागाच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत उघडकीस आला.

याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून झालेल्या तक्रारीनुसार सात कर्मचाऱ्यांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापैकी सहा जणांना बुधवारी सकाळी अटक केली, तर एक अद्याप फरार आहे.प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक प्रदीप विजयलाल गुजर (५८, रा. नर्मदा बंगला, ताराबाई पार्क, कोल्हापूर. मूळ रा. पुणे) यांनी तपासणीअंती मंगळवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये चौघा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील संशयित अटक कर्मचारी : वाहन चालक - वसंत भानूदास गौड (४७, रा. पिंजार गल्ली, आंबेडकर वसाहत, कसबा बावडा), वरिष्ठ सहायक -अक्षयकुमार सखाराम मालेकर (३३, रा. न्यू शाहुपुरी, सुर्वे कॉलनी), कंत्राटी कर्मचारी- मारुती अंबादास भोसले (३४, रा. शाहुपुरी २ री गल्ली), राहुल पांडुरंग चिले (३५, रा. फुलेवाडी ४ था स्टॉप), गणेश मारुती सपाटे (३०, रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ), विरुपक्ष रामू पाटील (२५, रा. विचारेमाळ, सदरबाजार). लॅब असिस्टंट मिलिंद शामराव पोटे (४९ रा. कलानगर, चंदूर रोड, इचलकरंजी) हा अद्याप गायब असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पोलीस ठाणे तसेच उत्पादन शुल्क विभागाने कारवाईत जप्त केलेली दारू ही तपासणीकरिता कोल्हापुरात दारुबंदी विभागाच्या ताराराणी चौकातील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवली जाते. अशा पद्धतीने विविध कारवायांत जप्त केलेल्यापैकी सुमारे ३१ हजार १७६ रुपये किमतीची दारू ही न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली होती; पण तेथील कर्मचाऱ्यांनी संगनमताने चोरून ती फस्त केल्याचे उघडकीस आले. 

टॅग्स :liquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूरExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग