शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाचे दुष्परिणाम पटवून द्या-सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 01:13 IST

इंटरनेट नावाच्या अस्त्र आणि शस्त्राने सगळ्यांचे जीवन व्यापले आहे; सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, त्याचे दुष्परिणाम हे नव्या पिढीसमोरील मोठे संकट आहे. यापासून त्यांचे संरक्षण

ठळक मुद्दे: डिजिटल गार्डियन कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर : इंटरनेट नावाच्या अस्त्र आणि शस्त्राने सगळ्यांचे जीवन व्यापले आहे; सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, त्याचे दुष्परिणाम हे नव्या पिढीसमोरील मोठे संकट आहे. यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना धोक्यांची जाणीव करून देणे ही पालक-शिक्षकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी केले.

शाहू स्मारक भवनात सतेज पाटील फौंडेशन, अहान फौंडेशन व कोल्हापूर माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने चाईल्ड आॅनलाईन प्रोटेक्शन (डिजिटल गार्डियन) या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अहान फौंडेशनच्या सोनाली पाटणकर, रिस्पॉन्सिबल नेटिझमचे उन्मेष जोशी, मुख्याध्यापक संघाचे दत्ता पाटील, सुरेश संकपाळ, भरत रसाळे, अ‍ॅड. वैशाली भागवत, बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य संतोष शिंदे, बालकल्याण समितीचे सदस्य डॉ. जे. के. पवार, जयंत आसगांवकर, बाबा पाटील, आदी उपस्थित होते.

सतेज पाटील म्हणाले, गेल्या तीन वर्षांत ५० कोटी लोकांच्या हातात स्मार्ट फोन आला आहे; तर प्रत्येक व्यक्ती दिवसभरातील किमान २ तास १९ मिनिटे स्क्रीन टाइमवर घालविते, असे सर्वेक्षण सांगते. ‘सायबर क्राइम’सारखे दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यामुळे आपण सजग राहणे आणि नव्या पिढीला सावध करणे हाच खबरदारीचा उपाय आहे.

यावेळी संतोष शिंदे यांनी मुलांचे संगोपन, बालहक्क, अधिकार आणि संरक्षण, पोक्सो कायदा यासंबंधीचाी विस्तृत माहिती दिली. अहान फौंडेशनच्या अध्यक्षा सोनाली पाटणकर यांनी सोशल मीडियाचा गैरवापर, दुष्परिणाम, मानसिक स्थिती यांवर मार्गदर्शन केले. तुषार भागवत उन्मेष जोशी यांनी सोशल मीडियाचे जग, खेळ वास्तव यांवर विवेचन केले. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचलन , उत्पल मदाने यांनी आभार मानले.रिस्पॉन्सिबल कोल्हापूरकर अभियान...सोशल मीडिया वापराच्या दुष्परिणामाबाबत नव्या पिढीला माहिती असावी, यापासून होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत रिस्पॉन्सिबल कोल्हापूरकर अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोल्हापूरकर हे फेसबुक पेज तयार केले आहे. ज्यांना या अभियानाचा एक भाग बनायचा आहे त्यांनी या फेसबुक पेजला जॉईन व्हावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात सतेज पाटील फौंडेशन, अहान फौंडेशन व मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत आमदार सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबा पाटील, जयंत आसगांवकर, डॉ. जे. के. पवार, उन्मेष जोशी, संतोष शिंदे, अ‍ॅड. वैशाली भागवत, सुरेश संकपाळ, भरत रसाळे उपस्थित होते.

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलSocialसामाजिक