शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळ्याच्या चौदा प्रकरणात घोटाळा झाल्याची कबूली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:07 IST

Muncipal Corporation, kolhapurnews, कोल्हापूर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घरफाळा घोटाळ्यावरुन गदोराळ झाला. तक्रार करण्यात आलेल्या १४ प्रकरणात घोटाळा झाल्याची कबुली प्रशासनाच्यावतीने चौकशी समितीचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांंनी दिली.

ठळक मुद्देघरफाळ्याच्या चौदा प्रकरणात घोटाळा झाल्याची कबूलीमहापालिका सभेत गदारोळ : दोषींवर फौजदारीची मागणी

कोल्हापूर : महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घरफाळा घोटाळ्यावरुन गदोराळ झाला. तक्रार करण्यात आलेल्या १४ प्रकरणात घोटाळा झाल्याची कबुली प्रशासनाच्यावतीने चौकशी समितीचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांंनी दिली.घोटाळ्यामधील सर्वच प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी विरोधी आघाडीने केली. यावेळी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.भूपाल शेटे यांनी घरफाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ३ कोटी १८ लाखांच्या घरफाळा नुकसानी प्रकरणी चौकशी समितीला कर निर्धारक संजय भोसले यांनी चुकीचा अहवाल दिला. तेच यामध्ये दोषी आहेत. १ कोटी ८५ लाखांच्या नुकसानीस ते स्वत : जबाबदार असून अहवालात याचा समावेश केला नाही. शहरातील सर्व मॉलचे करार तपासणी करावेत.प्रा. जयंत पाटील म्हणाले, घरफाळा घोटाळ्याची एकूण ६० प्रकरणे असून १२ प्रकरणाबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेले नाही. संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणी विनाकारण चर्चा होत असून त्यातून महापालिकेची बदनामी होत आहे.घरफाळा घोटळ्याच्या संपूर्ण प्रकरणात कोणाचीही गय करु नये, सर्व दोषींना निलंबित करुन फौजदारी कारवाई करावी. आठ दिवसांत यावर निर्णय झाला नाही तर महापालिकेसमोर उपोषण करु. जर यामध्ये टाळाटाळ अगर कोणाला वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालयात संबंधित अधिकाय्रांविरोधात याचिका दाखल करु असा, इशारा सदस्य भुपाल शेटे यांनी दिला.गटनेते अजित ठाणेकर यांनी सिस्टीम ऑडीटमध्ये एचएसल कंपनीवर ताशोरे ओढले आहेत. २०१२ पासून घरफाळ्यात मोठा घोटाळा झाले आहेत. केवळ १४ नव्हे तर संपूर्ण घरफाळाची चौकशी व्हावी. सत्यजित कदम, सदस्य किरण नकाते यांनीही प्रशासनाला धारेवर धरले.शेटे, पाटील, कदम यांच्यात टोलेबाजीघरफाळा घोटळ्यावरुन सदस्य भुपाल शेटे, सत्यिजत कदम आणि प्रा. जयंत पाटील यांच्यात टोलोबाजी रंगली. प्रा. पाटील यांनी घोटाळ्याची प्रकरण समोर आणली मात्र, माध्यमासमोर गेलो नाही. व्यक्तीदोषातून आम्ही आरोप करत नसल्याचे म्हटले. सदस्य कदम म्हणाले, दोन वर्षापूर्वी ताराराणी चौकातील एका हॉटेलचा चार कोटींचा घरफाळा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आणले होते.

याबाबत कोणीही चर्चा केली नाही. सर्वच घोटळ्याबाबत कारवाई झाली पाहिजे, यावर सदस्य शेटे यांनी आपणास मिळालेल्या माहितीवर आरोप करत आहे. लढा कायम ठेवला आहे. इतर प्रकरणाशी तुलना करु नये असे स्पष्ट केले.चौकशी समितीचा अंतिम अहवाल मिळल्यानंतर दोषींची गय केली जाणार नाही. संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, यामध्ये दिरंगाई केली जाणार नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर