शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा उद्रेक होण्याची चिंता, ग्रामसमित्यांनी अधिक दक्ष राहावे :  हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:41 IST

कोरोनाचा धोका संपलेला नाही, उलट तो वाढतच आहे. जुलैमध्ये त्याचा उद्रेक होण्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामदक्षता समित्यांनी आता अधिक सतर्क राहावे, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्देकोरोनाचा उद्रेक होण्याची चिंता, ग्रामसमित्यांनी अधिक दक्ष राहावे : हसन मुश्रीफगडहिंग्लज येथे स्वॅब तपासणी मशीन व प्रयोगशाळेचे उद्घाटन

गडहिंग्लज : कोरोनाचा धोका संपलेला नाही, उलट तो वाढतच आहे. जुलैमध्ये त्याचा उद्रेक होण्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामदक्षता समित्यांनी आता अधिक सतर्क राहावे, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी मशीन व प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.सी.केम्पी- पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.मुश्रीफ म्हणाले,रेड झोनमधून आलेल्या लोकांनी स्व:ताचे, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे आरोग्य धोक्यात आणतात.त्यामुळे त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरणातच ठेवावे.यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर,वैद्यकीय अधिक्षक दिलीप आंबोळे, किरण कदम, वसंत यमगेकर,सुरेश कोळकी,महेश सलवादे आदी उपस्थित होते.माझी झोपच उडाली..!गडहिंग्लज तालुक्यातील कोरोना बाधितांच्या आकड्याने शंभरी पार केली, हे चिंताजनक आहे.त्यामुळे माझी झोपच उडाली आहे.मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगबाबत कठोर कारवाई करा, अशी सक्त सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ